IPL 2021 : इंग्लंडचा धाकड फिरकीपटू पंजाब किंग्समध्ये, ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या जागी खेळणार

| Updated on: Aug 26, 2021 | 6:59 PM

कोरोनामुळे मध्येच थांबवण्यात आलेल्या यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचा संघ शेवटपर्यंत गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावरच होता. संघाने आठ पैकी केवळ तीनच सामने जिंकले आहेत.

IPL 2021 : इंग्लंडचा धाकड फिरकीपटू पंजाब किंग्समध्ये, ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या जागी खेळणार
पंजाब किंग्स
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत सामन्यांना सुरु होण्यास काही दिवस शिल्लक आहेत. 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सामन्यांना सुरुवात होणार असून या उर्वरीत 31 सामन्यांमध्येच यंदाचा विजेता संघ मिळणार आहे. विजयासाठी  प्रत्येक संघ आपआपली रणनीती तयार करण्यात व्यस्त आहे. अनेक संघ तर काही संघाचे खेळाडू युएईत पोहोचले असून त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे. तर संघ व्यवस्थापन संघ मजबूत करण्यासाठी नव्या खेळाडूंना संघात घेण्याचं काम करत आहे. नव्या खेळाडूंना संघात घेण्याची ही संधी पंजाब किंग्सनेही (Punjab Kings) सोडली नसून त्यांनी इंग्लंडच्या एका अप्रतिम गोलंदाजाला संघात घेतलं आहे.

पंजाबच्या संघाने इंग्लंडच्या आदिल रशीद (Adil Rashid) याला विकत घेतले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाए रिचर्डसन (Jhye Richardson) याच्याजागी रशीदला संधी दिली आहे. रिचर्डसनने उर्वरीत आयपीएलमधून माघार घेतल्याने पंजाबने हा निर्णय घेतला आहे. आदिल पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहे. एकीकडे इंग्लंडचे जोफ्रा, बेन स्टोक्स, जोस बटलर हे दिग्गज आयपीएलला अनुपस्थित राहणार असताना आदिल्च्या रुपात एक नवा इंग्लंडचा खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे.

आदिलची T20 कारकिर्द

आदिल रशीद टी20 क्रिकेटमध्ये एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मागील काही वर्षात समोर आला आहे. तो आयसीसीच्या टी-20 रँकिंगमध्येही चौथ्या नंबरवर आहे. त्याने इंग्लंडसाठी 62 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 65 फलंदाजाना माघारी धाडलं असून त्याचा इकोनॉमी रेट 7.48 आहे. तर संपूर्ण टी-20 कारकिर्दीत त्याने 201 सामन्यात 232 विकेट्स घेतले आहेत.  तो याआधी अनेकदा आयपीएलच्या ऑक्शनमध्ये सहभागी झाला होता. पण त्याला कोणत्याच संघाने विकत घेतलं नाही. मात्र आता युएईतील मैदानावर त्याची जादू चालवण्यासाठी पंजाबने त्याला संघात स्थान दिलं आहे.

IPL 2021 : सर्वात महागड्या खेळाडूच्या जागी केकेआरमध्ये ‘हा’ दिग्गज खेळणार, T20 क्रिकेटमध्ये 224 विकेट्स पटकावणारा महारथी

IPL 2021: जगातील नंबर 1 टी-20 बोलर राजस्थान रॉयल्समध्ये, ‘या’ खेळाडूच्या जागी खेळणार

IPL 2021 पूर्वीच धोनीने उडवले उंच षटकार, मग स्वत:च गेला झाडात चेंडू शोधायला, पाहा मजेशीर VIDEO

(Englands Adil rashid comes in Punjab kings on position of jhye richardson for ipl 2021)