T20 World Cup: स्कॉटलंडवर मोठा विजय तर मिळवला, पण भारताचं सेमीफायनलमध्ये पोहचणं अजूनही अवघड, असं आहे गणित

| Updated on: Nov 06, 2021 | 8:20 AM

विश्वचषकात सलग दोन पराभवांमुळे निराश टीम इंडियाने अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडला मात देत स्पर्धेत पुनरागमनाचा प्रयत्न केला आहे. पण तरीही सेमीफायनलमध्ये प्रवेशासाठी भारताला इतर संघाच्या गणितावर अवंलंबून रहावे लागले आहे.

T20 World Cup: स्कॉटलंडवर मोठा विजय तर मिळवला, पण भारताचं सेमीफायनलमध्ये पोहचणं अजूनही अवघड, असं आहे गणित
भारतीय संघ
Follow us on

T20 Cricket World Cup 2021: भारतीय क्रिकेट संघासाठी (Indian Cricket Team) यंदाच्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) अनेक चढ-उतार येत आहेत. पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध (India vs Afghanistan) आणि चौथा सामना स्कॉटलंडविरुद्ध (India vs Scotland) जिंकत भारताने पुनरागमन करण्याचा प्रयत्न तर केला आहे. पण सेमीफायनलमध्ये प्रवेशासाठी गणित थोडं वेगळं आहे

स्कॉटलंडला मात दिल्यानंतर भारत 2 विजयांसह 4 गुण घेऊन तिसऱ्या स्थानावर गेला आहे. नेट-रनरेटच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानला मागे टाकलं आहे. तसं पाहायाला गेलं तर भारताचा रनरेट पाकिस्तान आणि न्यूझीलंडपेक्षाही अधिक आहे. पण पाकिस्तान 4 पैकी 4 सामने जिंकत याआधीच पुढील फेरीत पोहोचला आहे. न्यूझीलंडनेही 3 सामने जिंकल्याने तो भारताच्या पुढे आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ जर त्यांचा सुपर 12 मधील शेवटचा सामना अफगाणिस्ताविरुद्ध पराभूत झाला तर तो केवळ 3 विजयासंह गुणतालिकेत राहिल. ज्यानंतर भारतही नामिबीयाला नमवून न्यूझीलंड इतकेच विजय मिळवून गुणतालिकेत असेल. अशावेळी अफगाणिस्तान, भारत आणि न्यूझीलंड तिन्ही संघ तीन विजयांसह गुणतालिकेत असल्यास उत्तर रनरेटच्या जोरावर भारतचं पुढील फेरीत जाईल. पण या सर्वासाठी मूळात अफगाणिस्तानने न्यूझीलंडला मात देणं गरजेचं आहे.

‘हा’ रविवार तरी भारताला आनंददायी असणार का?

यंदाच्या विश्वचषकातील पहिले दोन्ही रविवार भारतीयांसाठी निराशामय होते. पहिल्या रविवारी 24 ऑक्टोबरला पाकिस्तानने भारताला 10 विकेट्सनी मात दिली. मग दुसऱ्या रविवारी 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडने 8 विकेट्सनी मात दिली. त्यानंतर भारताने 2 विजय मिळवले असले तरी येणाऱ्या रविवारी (7 नोव्हेंबर) अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामनाच भारताचं विश्वचषकातील भविष्य ठरवणार आहे. सध्या तरी सर्व भारतीयांच्या नजरा न्यूझीलंडस अफगाणिस्तान सामन्याकडे आहेत. ही लढत रविवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.

टी20 विश्वचषकातील सामन्यांचा स्कोर आणि गुणतालिका सविस्तर पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

हे ही वाचा-

T20 world cup 2021: भारताविरुद्ध अफगाणिस्तान पराभूत, पण सामन्यात मिळाला बुमराहसारखा गोलंदाजी, पाहा VIDEO

India Cricket team: विराटनंतर टी20 संघाचा कर्णधार कोण?, तिघांमध्ये चुरशीची लढत, द्रविडची पसंती कोणाला?

Diwali Celebration: मास्टर-ब्लास्टरची मुलगी साराचा फेस्टीव्ह लूक पाहिलात का?, काळ्या रंगाच्या ड्रेसमधील हे PHOTO पाहाच!

(Even After win against scotland india will play semi final only if afghanistan beat new zealand)