Andre russell : माझ्यासाठी KKR ने जितका पैसा खर्च केला….

| Updated on: Apr 30, 2023 | 12:23 PM

Andre russell : माझ्यासाठी केकेआरने जितका पैसा खर्च केला, तितका पैसा माझ्या देशाने सुद्धा केला नाही. वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर आंद्र रसेलने त्याची फ्रेंचायजी केकेआरबद्दल महत्वाच विधान केलय.

Andre russell : माझ्यासाठी KKR ने जितका पैसा खर्च केला....
Andre Russell
Follow us on

कोलकाता : जगभरात इंडियन प्रीमियर लीगची चर्चा आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंवर जितका पैसा लावला जातो, तितका पैसा अन्य कुठल्याही क्रिकेट लीगमध्ये खर्च केला जात नाही. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी प्लेयर्सना कोट्यवधी रुपये मोजले जातात. फक्त पैसेच देत नाही, तर खेळाडूंच्या फिटनेसवरही तितकच लक्ष ठेवलं जातं. वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर आंद्र रसेलने त्याची फ्रेंचायजी केकेआरबद्दल महत्वाच विधान केलय.

माझ्या उपचारावर अन्य फ्रेंचायजी किंवा माझ्या देशानेही इतका खर्च केला नसेल, जितका केकेआरने मागच्या काही वर्षात केलाय. आंद्रे रसेल 2014 पासून केकेआरसाठी खेळतोय. तो टीमचा एक महत्वाचा खेळाडू आहे.

आंद्र रसेल केकेआरसाठी का महत्वाचा?

केकेआरला आयपीएलच विजेतेपद मिळवून देण्यात आंद्र रसेलने महत्वाची भूमिका बजावली आहे. चालू सीजनमध्ये आंद्रे रसेलकडून अपेक्षित कामगिरी होत नाहीय. अलीकडेच आरसीबीवरील केकेआरच्या विजयात त्याने महत्वाची भूमिका बजावली. त्याने सेट झालेल्या विराट कोहलीचा मोठा विकेट घेतला.

रसेलला कोणी मदत केली?

मागच्या काहीवर्षांपासून आंद्रे रसेल गुडघे दुखीच्या समस्येने त्रस्त आहे. केकेआरने उपचारासाठी आपल्याला मदत केली, असं आंद्रे रसेलने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सांगितलं.

माझ्या देशानेही इतकं केलं नाही

“वास्तवात केकेआर माझ्यासाठी बरच काही करतय. गुडघ्यावरील उपचारासाठी मला मदत केलीय. प्रामाणिकपणे सांगायच झाल्यास, माझ्याठी हे खास आहे, कारण अन्य फ्रेंचायजी किंवा माझा देशही माझ्यावर इतका खर्च करणार नाही” असं आंद्रे रसेलने सांगितलं.

किती वर्षापासून रसेल केकेआरकडून खेळतोय?

“आज मी केकेआरचा भाग असल्याने आनंदी आहे. मी इथे खूश आहे. केकेआरकडून मी 9 वर्षांपासून खेळतोय. आयपीएलच्या निमित्ताने या लोकांना भेटतो. त्यांना जाणून घेतो. क्रिकेट नसताना मी वेंकी मैसूर यांच्या संपर्कात असतो” असं आंद्रे रसेलने सांगितलं.

काल कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात टायटन्समध्ये सामना झाला. ही मॅच गुजरात टायटन्सने 7 विकेट आणि 13 चेंडू राखून जिंकला. केकेआरने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 7 बाद 179 धावा केल्या. गुजरातने हे लक्ष्य आरामात पार केलं.