IPL 2021 च्या सुरु होण्याआधीच जोस बटलर ( Jos Buttler), बेन स्टोक्सच्या ( Ben Stokes) अनुपस्थितीमुळे राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला धक्का बसला. हे दोन्ही इंग्लिश खेळाडू वेगवेगळ्या कारणांमुळे खेळू शकले नाहीत. अशा परिस्थितीत राजस्थान रॉयल्सला या दोन्ही खेळाडूंचे बदली खेळाडू शोधावे लागले. राजस्थान रॉयल्सने वेस्ट इंडिजचा डावखुरा फलंदाज एविन लुईसला (Evin Lewis) संधी दिली. हा निर्णय किती योग्य होता, असा प्रश्न त्यावेळी विचारला गेला. मात्र आता हा निर्णय योग्यच असल्याचं लुईसने सिद्ध केलं आहे. कारण सध्या हा खेळाडू अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सेंट लुसिया किंग्जकडून खेळताना त्याने आश्चर्यकारक फलंदाजी केली आणि सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये स्थान मिळवलं. त्याने 11 सामन्यांमध्ये 426 धावा केल्या. स्पर्धेत सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानावर होता. तसंच, सिक्सर ठोकण्यात त्याचा कुणीही हात धरु शकलं नाही. ( Evin Lewis, who hit 38 sixes in CPL 2021, will play for Rajasthan Royals in IPS 2021. )
Evin Lewis in this CPL 2021 so far:-
6(8).
62(39).
30(28).
39(27).
19(11).
73(42).
7(5).
5(4).
102*(52).
77*(39) in Semifinal.Most Runs scorer, Most 50+ scores, Joint Most 100, Most 6s, 2nd Most 4s, 2nd Best Strike Rate (164.72). – Incredible Performance by Lewis. #CPL21 pic.twitter.com/WfY6WmDmJe
— CricketMAN2 (@man4_cricket) September 15, 2021
एविन लुईसची CPL मधली कामगिरी
एविन लुईसने CPL 2021 मध्ये 47.33 च्या सरासरीने आणि 163.21 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याच्या नावावर 1 शतक आणि 3 अर्धशतके होती. नाबाद 102 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. सेंट लुसिया किंग्जच्या फलंदाजानी स्पर्धेदरम्यान चौकारांपेक्षा षटकारच जास्त मारले. त्याच्या बॅटने तब्बल 25 चौकार आणि 38 षटकार ठोकले. त्याच्यानंतर या स्पर्धेत निकोलस पूरन हा षटकार मारण्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने 11 सामन्यांत 25 षटकार मारले. म्हणजेच एव्हिन लुईसने पूरनपेक्षा 13 षटकार जास्त मारले, मात्र दोघेही समान सामने खेळले. सीपीएल 2021 मध्ये हा खेळाडू चौकार मारण्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने 25 चौकार मारले आणि फक्त रोस्टन चेस त्याच्या पुढे होता ज्याने 35 चौकार मारले.
Evin Lewis ? This #IPL gonna be good! @rajasthanroyals ?? #RR pic.twitter.com/kumGve2Hrc
— Frank (@franklinnnmj) September 12, 2021
मुंबई इंडियन्सकडून खेळलेला लुईस
IPL 2018 आणि 2019 मध्ये लुईस Mumbai Indins कडून खेळला होता. यावेळी त्याने 16 सामने खेळले आणि 131.1 च्या स्ट्राईक रेटने 430 धावा केल्या होत्या. त्याने आयपीएलमध्ये दोनदा अर्धशतक लगावलं आहे. एविन लुईस ओपनर म्हणून खेळतो. अशा स्थितीत राजस्थान रॉयल्सही त्याला त्याच भूमिकेत वापरू शकतो. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये त्याचा चांगला विक्रम आहे. त्याने 45 सामने खेळले आहेत आणि 31.38 च्या सरासरीने 1318 धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये 2 शतकं केली आहेत. यासह त्याच्या नावावर 9 अर्धशतकं आहेत.
संबंधित बातम्या: