T20 World Cup 2021 : टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा यंदाच्या स्पर्धेत त्यांच वर्चस्व का आहे हे दाखवून दिलं आहे. पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया संघासमोर 177 धावांच आव्हान ठेवलं आहे. यामध्ये सलामीवीर मोहम्मद रिजवानचं अर्धशतक जितकं महत्त्वाचं आहे, तितकचं अखेरच्या काही षटकात तुफानी फलंदाजी करत अनुभवी फखर जमानने झळकावलेलं अर्धशतकही आहे. रिजवानने 52 चेंडूत 67 धावांची तर फखर जमानने 32 चेंडूत 55 धावांची खेळी केली आहे.
मोहम्मद रिजवानच्या अर्धशतकाने पाकिस्तानला चांगली सुरुवात करु दिली. पण खरी फिनिशींग फखरच्या अर्धशतकानेच दिली. विशेष म्हणजे यंदाच्या स्पर्धेत फखर खेळत नसल्याने त्याला ट्रोल केलं जात होतं. पण आज अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात फखरने केलेल्या तुफानी खेळीने त्याने सर्वांची तोंडं बंद केली आहेत. त्याची आता सोशल मीडियावर वाह, वाह होत आहे.
Back to Back SIXES !!! Rocking shots , Rocking SIX for ROCKING KFC Zingers!!! Fakhar Zaman Rocks !!!#KFCHitForSix #PAKvAUS #KFCArabia pic.twitter.com/6HnDLsO0Ho
— Tariq Sheikh (@tariq26141) November 11, 2021
फखर जमान बाबर आजम बाद झाल्यानंतर फलंदाजीला आला. सुरुवातीला रिजवान फटकेबाजी करत असताना जमान शांत होता. पहिल्या 17 चेंडूत त्याने केवळ 17 रन केले. पण अखेरच्या काही षटकात त्याने गिअर वाढवत तुफान खेळी केली. मिचेल स्टार्कच्या 2 ओव्हरमध्ये तीन षटकार ठोकत 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. शेवटच्या 15 चेंडूत फखरने 38 धावा केल्या.
इतर बातम्या
T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहम्मद रिजवानचं अर्धशतक, 1000 धावा करत रचला इतिहास
(fakhar zaman smashed fast fifty in semi final match against australia)