Justice for Sanju Samson : संजू सॅमसनसाठी चाहते मैदानात, BCCI आणि निवड समितीवर भेदभावाचे आरोप

| Updated on: Nov 10, 2021 | 4:44 PM

विश्वचषकातून टीम इंडियाला लवकर एक्झिट घ्यावी लागली आहे. पण निराश न होता भारतीय संघ आगामी आव्हानांसाठी सज्ज झाला आहे. सर्वात आधी भारताच्या दौऱ्यावर येणाऱ्या न्यूझीलंड संघाविरुद्ध भारताने टी-20 संघाची घोषणा केली आहे.

Justice for Sanju Samson : संजू सॅमसनसाठी चाहते मैदानात, BCCI आणि निवड समितीवर भेदभावाचे आरोप
Sanju Samson
Follow us on

मुंबई : विश्वचषकातून टीम इंडियाला लवकर एक्झिट घ्यावी लागली आहे. पण निराश न होता भारतीय संघ आगामी आव्हानांसाठी सज्ज झाला आहे. सर्वात आधी भारताच्या दौऱ्यावर येणाऱ्या न्यूझीलंड संघाविरुद्ध भारताने टी-20 संघाची घोषणा केली आहे. यावेळी रोहित शर्माला कर्णधार तर केएल राहुलला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. यावेळी विश्वचषक खेळलेल्या 8 खेळाडूंना विश्रांती दिली असून विशेष म्हणजे 3 खेळाडूंना पहिल्यांदाच टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळणार आहे. आवेश खान, हर्षल पटेल आणि वेंकटेश अय्यर या तीन नव्या खेळाडूंसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले आहेत. दरम्यान, या मालिकेसाठी टीम इंडियात ऋषभ पंत आणि इशान किशन हे दोन यष्टीरक्षक फलंदाज भारतीय संघाकडून खेळणार आहेत. (Fans Trend Justice for Sanju Samson After bcci dropped him from team for India vs New Zealand T20I Series)

दरम्यान, स्टार फलंदाज आणि यष्टीरक्षक संजू सॅमसनला (Sanju Samson) या मालिकेत संधी देण्यात आलेली नाही. संघात ऋषभ आणि इशान हे दोन यष्टीरक्षक फलंदाज असल्याने संजूला संधी देता आली नाही. या मालिकेसाठी बीसीसीआयने अनेक मोठ्या नावांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणास्तव अनेक तरुण चेहऱ्यांची निवड त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी करण्यात आली आहे. या सगळ्यात संजू सॅमसनच्या नावाची अनुपस्थिती चाहत्यांना खटकली आहे. सोशल मीडियावरही त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआय ज्या प्रकारे इशान किशन आणि ऋषभ पंतला पाठिंबा देत आहे, ते संजू सॅमसनला पाठिंबा देत नाही, असे संजूच्या चाहत्यांना वाटते.

संजू सॅमसनच्या समर्थनार्थ हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत संजू सॅमसनची निवड न झाल्यामुळे संतप्त चाहत्यांनी सोशल मीडियावर #justiceforsanjusamson (संजू सॅमसनला न्याय) हा हॅशटॅग ट्रेंड केला. चाहत्यांनी बीसीसीआयच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की, सॅमसनसारख्या फलंदाजाला ते संघाबाहेर कसे काय ठेवू शकतात. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने खोऱ्याने धावा करत असताना सॅमसनला टी-20 विश्वचषकातही संधी देण्यात आली नव्हती.

अनेक चाहत्यांचे विशेषत: संजू सॅमसनच्या चाहत्यांचे म्हणणे आहे की, निवडकर्ते सॅमसनशी भेदभाव करत आहेत. काही क्रिकेट चाहते संजू सॅमसनची देशांतर्गत क्रिकेटमधील, आयपीएलमधील आकडेवारी शेअर करत आहेत तर काही त्याच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक करत आहेत. सॅमसन हा चांगला यष्टिरक्षक असण्यासोबतच चांगला क्षेत्ररक्षकही आहे.

इतर बातम्या

टीम इंडियात उभी फूट, विराट कोहली लवकरच संन्यास घेणार; दिग्गज पाकिस्तानी खेळाडूचं भाकित

India vs New Zealand: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, 3 खेळाडू करणार टीम इंडियामधून डेब्यू, आयपीएलमधील कामगिरीनंतर BCCI कडून संधी

T20 World Cup मधील प्रदर्शनानंतर दिनेश कार्तिकने निवडली त्याची प्लेयिंग 11, बाबर आजम कर्णधार, रोहित-विराट बाहेर

(Fans Trend Justice for Sanju Samson After bcci dropped him from team for India vs New Zealand T20I Series)