रोहित भाईची फलंदाजी पाहून घाबरलो, गोलंदाजी करण्याची हिंमत होत नव्हती; स्टार पाकिस्तानी गोलंदाजाची कबूली

| Updated on: Oct 24, 2021 | 7:45 PM

मुंबई : भारत आणि पाकिस्तानचे संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार कमी प्रसंगी आमने-सामने येतात. आज (रविवार) जेव्हा दोन्ही संघ टी-20 विश्वचषकात आमनेसामने येतील तेव्हा दोन्ही देशांचे चाहते आपापल्या देशांच्या विजयाच्या आशेवर असतील. दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर येतात. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात दोन्ही संघ शेवटच्या वेळी भिडले होते. त्यावेळी भारताचा सलामीवीर रोहित शर्मा उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता, […]

रोहित भाईची फलंदाजी पाहून घाबरलो, गोलंदाजी करण्याची हिंमत होत नव्हती; स्टार पाकिस्तानी गोलंदाजाची कबूली
रोहित शर्मा
Follow us on

मुंबई : भारत आणि पाकिस्तानचे संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार कमी प्रसंगी आमने-सामने येतात. आज (रविवार) जेव्हा दोन्ही संघ टी-20 विश्वचषकात आमनेसामने येतील तेव्हा दोन्ही देशांचे चाहते आपापल्या देशांच्या विजयाच्या आशेवर असतील. दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर येतात. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात दोन्ही संघ शेवटच्या वेळी भिडले होते. त्यावेळी भारताचा सलामीवीर रोहित शर्मा उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता, हे पाहून पाकिस्तानी गोलंदाजांचे धाबे दणाणले होते. (‘Felt like there was no way to dismiss him’: Hasan Ali recounts experience of bowling to Rohit Sharma in World Cup 2019)

रोहितच्या फलंदाजीला घाबरणाऱ्यांमध्ये पाकिस्तानचा स्टार गोलंदाज हसन अलीदेखील होता. रविवारी सामन्याआधी हसन अलीने रोहित शर्माची जोरदार स्तुती केली. विश्वचषकाचा काळ आठवत त्याने सांगितले की, या भारतीय फलंदाजाला त्यावेळी फलंदाजी करताना पाहून भीती वाटली होती. तो रोहितला कसा सामोरा जाईल असा प्रश्न त्याला पडू लागला होता.

हसन अली रोहित शर्माला घाबरत होता

हसन अलीला मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले, ‘तुला कधी असं वाटलंय का, हा फलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि आता मी याला कसा रोखू शकेन? हसन अलीने वेळ न घेता रोहित शर्माचे नाव घेतले. पाकिस्तानचा हा स्टार गोलंदाज म्हणाला, ‘होय, ते अगदी बरोबर आहे. रोहित भाईला विश्वचषक सामन्यात खेळताना पाहून भीती वाटली होती. 140 धावा करुन तो बाद झाला पण त्याला गोलंदाजी करणे खूप कठीण वाटत होते.

रोहितने 2019 च्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध 113 चेंडूत 140 धावा फटकावल्या होत्या. या डावात त्याने 14 चौकार आणि तीन षटकार ठोकले होते. रोहित हसनच्याच चेंडूवर रियाझकडे झेल देत बाद झाला होता. रोहित या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने नऊ सामन्यांमध्ये 648 धावा केल्या होत्या, ज्यात पाच शतकांचा समावेश आहे.

आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा 12 सदस्यीय संघ जाहीर

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरीस रौफ, हैदर अली.

कशी असेल भारताती प्लेईंग XI?

सलामीवीर : संघात सलामीची जबाबदारी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यावर असेल.

मधली फळी : तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि त्यानंतर अनुक्रमे सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांची नावे समाविष्ट केली जातील.

खालची फळी (अष्टपैलू-गोलंदाज) : रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार

(‘Felt like there was no way to dismiss him’: Hasan Ali recounts experience of bowling to Rohit Sharma in World Cup 2019)