गुवाहाटी: श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजपासून टीम इंडिया वनडे वर्ल्ड कपची तयारी करणार आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात वनडे वर्ल्ड कप होणार आहे. गुवाहाटी वनडेपासून वर्षातील पहिली वनडे सीरीज सुरु होत आहे. टीम इंडिया या मॅचसाठी आपली बेस्ट प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवेल. आता टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कुठले प्लेयर्स खेळणार हे महत्त्वाचं आहे. गुवाहाटी वनडेच्या प्लेइंग इलेव्हनवरुन पेच कायम आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेशासाठी सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरमध्ये तगडी स्पर्धा आहे.
सूर्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, पण…..
सूर्यकुमार यादव सध्या चर्चेत आहे. त्याने आपल्या खेळाने सर्वांचच मन जिंकून घेतलय. टी 20 फॉर्मेटमध्ये या खेळाडून कमाल केलीय. श्रीलंकेविरुद्ध राजकोट येथे तिसऱ्या टी 20 मध्ये शतक ठोकून सूर्याने टीमला मालिका विजय मिळवून दिला. दुसऱ्याबाजूला श्रेयस अय्यर सुद्धा दमदार खेळतोय. त्यामुळे अय्यर आणि सूर्यकुमारमध्ये खेळणार कोण? हा प्रश्न निर्माण झालाय.
…मग एकावर अन्याय होईल
सूर्यकुमार आणि श्रेयस अय्यरमध्ये स्पर्धा यासाठी आहे, कारण, रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांनी टीममध्ये पुनरागमन केलय. या तिघाचं खेळणं निश्चित आहे. शुभमन गिलला संधी देणार असल्याच रोहितने आधीच स्पष्ट केलय. तुमचे 4 बॅट्समन सेट आहेत. मग पाचव्या नंबरवर कोण येणार?. पाचव्या नंबरसाठी सूर्यकुमार आणि अय्यरमध्ये स्पर्धा आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये स्पर्धा आहे. एकाला बाहेर बसवणं हा दुसऱ्या प्लेयरवर अन्याय ठरेल.
श्रेयस अय्यरने वनडेमध्ये दाखवला दम
श्रेयस अय्यरने मागच्यावर्षी वनडे फॉर्मेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं. त्याने 15 मॅचेसमध्ये 55.69 च्या सरासरीने 724 धावा फटकावल्या. अय्यरने एक शतक आणि 6 अर्धशतकं झळकावली. अय्यरने आपलं बेस्ट प्रदर्शन केलय. त्यामुळे त्याला प्लेइंग 11 बाहेर ठेवणं चुकीच ठरेल.
सूर्यकुमारची कामगिरी कशी आहे?
दुसरीकडे वनडे फॉर्मेटमध्ये सूर्यकुमार यादवच प्रदर्शन खराब आहे. त्याने वर्ष 2022 मध्ये वनडेमध्ये 26 च्या सरासरीने 260 धावा केल्यात. सूर्यकुमारने फक्त एक हाफ सेंच्युरी झळकवली आहे. फक्त तो टी 20 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आता रोहित शर्मा कोणाला संधी देतो, ते लवकरच समजेल.