MI vs DC WPL 2023 Final : यंदा प्रथमच बीसीसीआयने आयपीएलच्या धर्तीवर वूमन्स प्रीमिअर लीग आयोजित केली आहे. आज WPL 2023 चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन टीम्समध्ये फायनल सामना होणार आहे. मुंबईच नेतृत्व भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरकडे तर दिल्लीच नेतृत्व मेग लेनिंगकडे आहे. आतापर्यंत मुंबई टीमची या स्पर्धेतील कामगिरी शानदार राहिली आहे. त्यांनी रुबाबात अंतिम फेरीत प्रवेश केला.
आज वूमन्स प्रीमिअर लीगच्या अंतिम सामन्यातही मुंबई इंडियन्सने तशीच कामगिरी करावी, अशी तमाम क्रिकेट चाहत्यांची इच्छा असेल. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने आतापर्यंतच्या आपल्या करिअरमध्ये अनेक रेकॉर्ड केले आहेत.
हरमनप्रीतच्या स्टोरीमध्ये विलन कोण?
हरमनप्रीतने कधी उपयुक्त फलंदाजी करुन, तर कधी गोलंदाजीच्या बळावर टीमला विजय मिळवून दिलाय. पण हरमनप्रीत कौरच्या क्रिकेट स्टोरीमध्ये सर्वात मोठी विलन आहे, मेग लेनिंग. लेनिंगने आतापर्यंत अनेकदा हरमनप्रीतच मन मोडलय.
हरमनप्रीतच्या नेतृत्वात टीम इंडियाच धडाकेबाज प्रदर्शन
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मागच्या काही वर्षात टीम इंडियाने बरच यश मिळवलय. 2020 मध्ये टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये, तर मागच्यावर्षी कॉमनवेल्थ गेम्सच्या फायनलमध्ये टीम इंडियाने धडक मारली. दोन्हीवेळा लेनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन टीमने हरमनप्रीत कौरच मन मोडलं.
ऐतिहासिक विजयापासून लांब ठेवलं
2020 मध्ये टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवलं होतं. लेनिंगच्या टीमने हरमनप्रीतच पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच स्वप्न मोडलं. टीम इंडिया कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकण्यााच्या जवळ होती, त्यावेळी मेग लेनिंगने हरमनप्रीत कौरला या ऐतिहासिक विजयापासून लांब ठेवलं.
हॅप्पी एंडिंगची अपेक्षा
महिला प्रीमिअर लीगच्या फायनलमध्ये पुन्हा एकदा या दोन्ही कॅप्टन आमने-सामने आहेत. मेग लेनिंग फायनलमध्ये थेट एंट्री करणारी दिल्ली कॅपिटल्स टीमची कॅप्टन आहे. हरमनप्रीत मुंबई इंडियन्सच नेतृत्व करताना दिसेल. यावेळी हरमनप्रीतला ‘हॅप्पी एंडिंग’ मिळेल, अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा आहे.
मुंबई-दिल्लीने लीगमध्ये किती सामने जिंकलेत?
दिल्ली आणि मुंबई टीमचा WPL मधील प्रवास जवळपास सारखाच आहे. दोन्ही टीम्सनी लीग राऊंडमध्ये 8 पैकी 6 सामने जिंकलेत. दोन्ही टीम्समध्ये फक्त नेट रनरेटचा फरक होता. रविवारी पहिल्यांदा WPL चा फायनल सामना खेळला जाणार आहे. दोन टीम्सपैकी चॅम्पियन कोण बनतं? त्याची उत्सुक्ता आहे, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 5 वेळा जेतेपद पटकवलय. तोच लौकीक महिला टीमने कायम राखावा, अशी तमाम क्रिकेट चाहत्यांची इच्छा असेल.