कमबॅकसाठी Rohit Sharma ची जोरदार तयारी, फिटनेसच्या बाबतीत विराटला टक्कर, पाहा Photos
भारताचा एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. मात्र आता तो घरच्या मैदानात खेळवल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी पूर्णपणे सज्ज आहे.
1 / 4
भारताचा एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. मात्र आता तो घरच्या मैदानात खेळवल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी पूर्णपणे सज्ज आहे. गेल्या महिनाभरात रोहितने एनसीएमध्ये (राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये) खूप मेहनत घेतली आहे. ज्याचे चांगले परिणाम आता पाहायला मिळत आहेत.
2 / 4
रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला नव्हता, कारण त्याला डिसेंबर महिन्यात हॅमस्ट्रिंग इंज्युरी झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त (फिट) आहे आणि त्याला आता एनसीएकडून फिटनेस प्रमाणपत्रही सहज मिळेल. मात्र, बीसीसीआयने रोहितला फिटनेसवर अधिक मेहनत घेण्यास सांगितले असल्याचेही बोलले जात आहे.
3 / 4
रोहित शर्माला त्याच्या फिटनेस आणि वजनामुळे अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत एनसीएमध्ये राहून प्रशिक्षकांच्या सांगण्यावरून त्याने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. यासाठी रोहितने काटेकोर डाएट फॉलो केला आणि फिजिकल ट्रेनिंगमध्येही बराच वेळ घालवला, ज्याचा परिणाम आता दिसू लागला आहे.
4 / 4
रोहित शर्माने नुकताच इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो त्याच्या ट्रेनरसोबत उभा आहे. या फोटोमध्ये रोहित पूर्वीपेक्षा बारीक दिसत आहे. भारतीय कर्णधाराचा फोटो पाहून चाहत्यांना तसेच त्याच्या पत्नीलाही आश्चर्य वाटले. अनेकांनी त्या फोटोखाली कमेंट करताना आश्चर्यचकित झालेल्या इमोजी पोस्ट केल्या आहेत.