मुंबई : आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषकाच्या तारखा काही दिवसांपूर्वीच आयसीसीने जाहीर केल्या होत्या. त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी आयसीसीने सामन्यांंचे वेळापत्रकही जाहीर केले. त्यामुळे आता सर्व संघ आपआपली रणनीती ठरवत असून संघ बांधणीलाही सुरुवात झाली आहे. भारताकडे सद्यस्थितीला चांगल्या दर्जाचे अनेक खेळाडू असून अंतिम 11 मध्ये कोणाला स्थान द्यायचं? हा प्रश्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर (BCCI) आहे. दरम्यान पुढील आठवड्याच या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता आहे. कारण आगामी विश्वचषकासाठीच्या 18 खेळाडूंची निवड 10 सप्टेंबर पर्यंत करायची आहे. पण रिपोर्ट्सनुसार इंग्लंड विरुद्धची चौथी कसोटी संपल्यानंतरच संघनिवड होईल असं सांगण्यात आलं आहे.
एएनआयच्या रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) वरिष्ठ निवड समितीसोबत पुढील आठवड्यात सोमवारी किंवा मंगळवारी म्हणजे 6 ते 7 सप्टेंबर रोजी बैठक होईल. ज्यावेळी संघ निवड केली जाईल. नियमांनुसार आयसीसी स्पर्धांसाठी 15 मुख्य खेळाडूंसह 3 स्टँडबाय खेळाडू असा संघ निवडावा लागतो. त्यानुसार BCCI ला संघ निवडावा लागणार आहे.
टीम इंडियाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे असून रोहित शर्मा, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादव या खेळाडूंची निवड जवळपास निश्चित आहे. पण शिखर धवन, पृथ्वी शॉ, मोहम्मद शमी, दीपक चाहर, युजवेंद्र चहल या खेळाडूंच्या निवडीवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. याशिवाय श्रेयस अय्यर नुकताच दुखापतीतून सावरला असून त्याच्या निवडीवरही सगळ्यांचे लक्ष असेल. तसंच अष्टपैलू हार्दीक पंड्यालाही अनेक पर्याय उपलब्ध असल्याने त्याची निवड होईल की नाही? हा प्रश्नही कायम आहे. पंड्याला सध्या शिवम दुबे, शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर हे तगडे पर्याय उपलब्ध आहेत.
संबंधित बातम्या
(For ICC t20 world cup 2021 indian team selection on 6th or 7th september says reports)