IND vs SA Test | वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमधील पराभवानंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा टीम इंडियाच नेतृत्व करणार आहे. रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या सीरीजमध्ये टीम इंडियाच नेतृत्व करणार आहे. आज म्हणजे 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिल्या कसोटी सामन्याआधी रोहित शर्मा कुठल्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देणार? हा मोठा प्रश्न आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला, तर अस दिसतय की, रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधी चुकीची पुनरावृत्ती करु शकतो.
दक्षिण आफ्रिकेतून जे रिपोर्ट्स येत आहेत, त्यावरुन असं वाटतय की, रविचंद्रन अश्विनला पहिल्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. अश्विन कसोटी क्रिकेटमधील नंबर 1 गोलंदाज आहे. मात्र, असं असलं तरी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. वर्ल़्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धही अश्विन प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. टीम इंडियाचा WTC फायनलमध्ये पराभव झाला होता.
बॅलन्स करण्यासाठी तो बाहेर का?
त्यावेळी इंग्लंडच्या कंडीशन्स अश्विनला संधी देण्यासाठी अनुकूल नाहीत, असं कारण देण्यात आलं होतं. आता दक्षिण आफ्रिकेतही हेच कारण दिलं जाऊ शकतं. सेंच्युरियनच्या विकेटवर वेगवान गोलंदाजांचा दबदबा राहिला आहे. अशावेळी टीम इंडिया बॅलन्स करण्यासाठी अश्विनला वगळू शकते.
दक्षिण आफ्रिकेत विकेट घेण्याची त्याची क्षमता नाही का?
कसोटी क्रिकेटमधील नंबर 1 गोलंदाज अश्विनला बाहेर ठेवण्याचा निर्णय योग्य राहिल का?. आफ्रिकन भूमीवर विकेट घेण्याची अश्विनची क्षमता नाही का?. दक्षिण आफ्रिकेत अश्विनचा रेकॉर्ड खराब आहे. अश्विन दक्षिण आफ्रिकेत 6 कसोटी सामने खेळला असून त्याच्या खात्यावर 10 विकेट आहेत. हे खूपच खराब प्रदर्शन आहे. पण आकडे पाहून तुम्ही अश्विनला बाहेर ठेऊ शकत नाही. कारण मागच्या 2-3 वर्षांपासून अश्विनने आपल्या गोलंदाजीचा स्तर कमालीचा उंचावला आहे. दक्षिण आफ्रिकेतील बाऊन्सचा फायदा उचलू शकतो.
भारताकडून दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक विकेट कोणाच्या नावावर?
दक्षिण आफ्रिकेत स्पिनर्स चालत नाहीत असं ज्यांना वाटतं, त्यांची विचार करण्याची पद्धत चुकीची आहे. दक्षिण आफ्रिकेत भारतासाठी सर्वाधिक विकेट स्पिनर्सनीच घेतले आहेत. दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक विकेट अनिल कुंबळेच्या नावावर आहेत. त्याने तिथे 45 विकेट काढलेत. त्यानंतर जवागल श्रीनाथचा नंबर येतो. त्याच्या खात्यात 43 विकेट आहेत.