दुबई : कोरोनाचा शिरकाव त्यामुळे एकीकडे स्थगिती, मग स्पर्धेचं ठिकाण बदलत अखेरकार आयपीएल 2021 (IPL2021) पार पडली. त्यानंतर आता टी20 विश्वचषकाला (T20 World Cup 2021) सुरुवात झाली आहे. पण सोबतच आगामी आयपीएल अर्थात IPL 2022 संबंधित अनेक बातम्या समोर येत आहेत. यावेळी आयपीएलमध्ये 8 नव्हे तर 10 संघ खेळणार असल्याचं यापूर्वीच समोर आलं होतं. त्यानुसार दोन नव्या संघांची घोषणाही काही दिवसांपूर्वीच करण्यात आली. लखनौ आणि अहमदाबाद या दोन संघाची एन्ट्री झाल्यानंतर आता खेळाडूंची लिलावप्रक्रिया पार पडण्यापूर्वी आणखी काही महत्त्वाचे नियम समोर आले आहेत.
नव्याने समोर आलेल्या नियमांनुसार आधीपासून आयपीएलमध्ये खेळत असलेले 8 संघ हे त्यांचे 4 जुने खेळाडू रिटेन करु शकतात. अर्थात संघात कायम ठेवू शकतात. असे करुन उरलेल्या खेळाडूंपैकी प्रत्येकी 3 खेळाडू हे नव्याने सामिल झालेले लखनौ आणि अहमदाबाद हे संघ आपल्या ताफ्यात घेऊ शकणार आहेत. आगामी लिलावाची तारीख जाहीर झाली नसली तरी यंदा संघाना 90 कोटी रुपये घेऊन खेळाडू विकत घेता येणार आहेत. मागील वर्षी ही किंमत 85 कोटी इतकी होती.
या नव्याने जाहीर केलेल्या नियमांनुसार आयपीएलमध्ये सध्या खेळत असलेले 8 संघ हे संघात ठेवणाऱ्या खेळाडूंमध्ये 4 खेळाडूंपैकी 3 भारतीय 1 परदेशी किंवा 2 भारतीय आणि 2 परदेशी असंही संयोजन वापरु शकतात. तर नव्या संघासाठी 3 पैकी 2 भारतीय आणि 1 परदेशी खेळाडू घेण्याचा नियम करण्यात आला आहे.
दुबईमध्ये झालेल्या नव्या संघाच्या लिलाव प्रक्रियेत तब्बल 12 हजार कोटींच्या घरात दोन्ही संघ विकत घेण्यात आले आहेत. यावेळी अदानी ग्रुप, टॉरेंट आणि मँचेस्टर यूनाइटेडसारख्या बड्या कंपन्या आणि संघासह रणवीर सिंगसारखा अभिनेताही लिलाव प्रक्रियेत होता. यावेळी अदानी ग्रुप, टॉरेंट आणि मँचेस्टर यूनाइटेड यांची बोली 5000 कोटींपर्यंतच पोहचली. तर संजीव गोएन्का ग्रुपने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावत लखनौ संघ जवळपास 7 हजार 90 कोटी रुपयांना विकत घेतला आहे.तर सीवीसी कॅपिटलने अहमदाबाद संघाला जवळपास 5 हजार 625 कोटी रुपयांना लिलावात मिळवला आहे. त्यामुळे या दोन्ही संघासाठी मोजावी लागलेली किंमत तब्बल 12 हजार कोटींहूनही अधिक आहे.
इतर बातम्या
पाकिस्तानच्या क्रिकेट संघात 3 खेळाडू कोरोनाबाधित, क्रिकेट बोर्डाने दिली माहिती
T20 World Cup 2021 मध्ये ‘या’ गोलंदाजांचा जलवा, भारताचे शेजारी करत आहेत धमाल!
(For IPL 2022 new IPL Retention Rules comes in which old teams can keep four players ahead of 2022 auction and three early picks for new teams Ahmedabad and Lucknow IPL franchise)