IPL 2024 | रोहित शर्माला 2 वर्ष ज्या प्लेयरचा फायदा झाला नाही, तो विराट कोहलीला चॅम्पियन बनवेल का?

| Updated on: Mar 15, 2024 | 10:09 AM

IPL 2024 | आयपीएल 2024 च्या सीजनला पुढच्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. सगळ्याच क्रिकेटप्रेमींच लक्ष या सीजनवर आहे. एक मोठा प्लेयर अचानक आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो अशी चर्चा आहे. महत्त्वाच म्हणजे अजूनपर्यंत एकही आयपीएलच विजेतेपद मिळवू न शकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमकडून हा प्लेयर खेळू शकतो.

IPL 2024 | रोहित शर्माला 2 वर्ष ज्या प्लेयरचा फायदा झाला नाही, तो विराट कोहलीला चॅम्पियन बनवेल का?
IPL 2024
Image Credit source: PTI
Follow us on

नवी दिल्ली : IPL 2024 चा नवीन सीजन सुरु व्हायला आता फक्त काही दिवस उरले आहेत. वेगवेगळ्या फ्रेंचायजींच्या टीममध्ये खेळाडूंच इन-आऊट सुरु आहे. काही खास खेळाडू वेगवेगळ्या कारणांमुळे यंदाच्या सीजनमध्ये खेळू शकणार नाहीयत. त्यांच्याजागी दुसऱ्या प्लेयर्सची एंट्री झाली आहे. आता टुर्नामेंट काही दिवसांवर आलेली असताना एका खेळाडूच्या येण्याच्या बातमीमुळे अनेकांना धक्का बसेल. या प्लेयरची मुंबई इंडियन्सने खूप वाट पाहिली. पण काही फायदा झाला नाही. हा प्लेयर आहे, इंग्लंडचा धाकड गोलंदाज जोफ्रा आर्चर. वेगवेगळ्या दुखापतींमुळे जोफ्रा आर्चर मागच्या 3 वर्षांपासून हैराण आहे. क्रिकेट खेळताना तो अपवादानेच दिसलाय. आता बातमी अशी आहे की, फाफ डुप्लेसीची RCB टीम जोफ्रा आर्चरला करारबद्ध करण्याचा विचार करत आहे. आता अचानक आर्चरच नाव समोर आल्याने धक्का बसण स्वाभाविक आहे.

जोफ्रा आर्चर सध्या भारतात आला आहे. इंग्लंडचा हा अव्वल गोलंदाज सध्या भारतात आहे. RCB च घर बंगळुरुमध्ये तो आहे. आर्चर सध्या आपला काऊंटी क्लब ससेक्सच्या टीमसोबत भारत दौऱ्यावर आला आहे. ससेक्सची टीम काही फर्स्ट क्लास सामने खेळणार आहे. सध्या ही टीम बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर नॅशनल क्रिकेट एकेडमीमध्ये प्रॅक्टिस करत आहे. IPL जवळ आहे आणि आर्चर बंगळुरुमध्ये. अशावेळी अफवांचा बाजार गरम होण स्वाभाविक आहे. सोशल मीडियावर आरसीबीच्या अनेक फॅन्सनी दावा केलाय की, या सीजनमध्ये खेळण्यासाठी आरसीबीने आर्चरशी संपर्क साधलाय. अशी चर्चा होण्यामागे बँगलोरच्या टीमचा इंग्लिश ऑलराऊंडर टॉम करणची दुखापत हे सुद्धा एक कारण आहे. जानेवारीत बिग बॅश लीगमध्ये टॉम करणला दुखापत झाली होती. त्याच्या खेळण्याबद्दल संभ्रम आहे.


दाव्यात किती तथ्य आहे?

जोफ्रा आर्चर RCB कडून खेळणार, या दाव्यात किती तथ्य आहे, ते येणाऱ्या दिवसात समजेलच. सध्या फक्त टी 20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी आर्चर ससेक्स टीमसोबत भारतात आलाय. जूनमध्ये T20 वर्ल्ड कप होणार आहे. त्याआधी आर्चर पूर्णपणे फिट व्हावा अशी इंग्लंडची अपेक्षा आहे. आर्चर यावेळी आयपीएल खेळणार नाही, हे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आधीच स्पष्ट केलय.