बुर्ज खलीफावर झळकले भारतीय खेळाडू
भारताची ही नवी जर्सी बुर्ज खलिफावर झळकली, तेव्हा अप्रतिम अशी रोषणाई कऱण्यात आली होती. अवघा बुर्ज खलिफा भारताच्या जर्सीच्या रंगात न्हावून गेला. यावेळी भारताचे काही क्रिकेटरही इमारतीवर झळकले. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, बुमराह अशा काहींचा समावेश आहे. या सर्वांनी नवी जर्सी घातली असून ते जल्लोष करताना दिसत आहे.
Presenting the Billion Cheers Jersey!
The patterns on the jersey are inspired by the billion cheers of the fans.
Get ready to #ShowYourGame @mpl_sport.
Buy your jersey now on https://t.co/u3GYA2wIg1#MPLSports #BillionCheersJersey pic.twitter.com/XWbZhgjBd2
— BCCI (@BCCI) October 13, 2021
टी 20 विश्वचषकासाठी भारत तयार
क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत. भारताने संघ जाहीर केला असून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं आहे. धोनीला हे पद सोपवत भारताने एक नवा डाव खेळला असून सर्वांचे लक्ष भारताच्या विश्वचषक कामगिरीकडे लागले आहे.
टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ
भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षर पटेल
भारताचे विश्वचषकातील सामने
भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-
- भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
- भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
- भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
- भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)