Team India : ‘हे’ तीन प्लेयर बनू शकतात टेस्टमध्ये टीम इंडियाचे उपकर्णधार, रोहित नंतर कॅप्टनशिपसाठी सुद्धा दावेदार

| Updated on: May 11, 2023 | 8:39 AM

Team India : WTC फायनलनंतर टीम इंडियाला नवीन उपकर्णधार मिळू शकतो. केएल राहुलला उपकर्णधार पदावरुन हटवलं, त्यानंतर या पदासाठी तीन दावेदार टीम इंडियामध्ये आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

Team India : हे तीन प्लेयर बनू शकतात टेस्टमध्ये टीम इंडियाचे उपकर्णधार, रोहित नंतर कॅप्टनशिपसाठी सुद्धा दावेदार
kl rahul
Follow us on

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल 7 ते 11 जून दरम्यान इंग्लंडच्या केनिंगटन ओव्हल मैदानात खेळली जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर टीम इंडियाला त्यांचा नवीन उपकर्णधार मिळू शकतो. याचवर्षी BCCI च्या सिलेक्शन कमिटीने केएल राहुलला टेस्ट टीमच्या उपकर्णधारपदावरुन हटवलं.

केएल राहुलनंतर टीम इंडियात असे तीन खेळाडू आहेत, जे उपकर्णधार बनण्यासाठी दावेदार आहेत. टीम इंडियाचे उपकर्णधार बनण्याच्या शर्यतीत असलेल्या तीन खेळाडूंवर नजर मारुया.

तो उपकर्णधार बनला, तर केएल राहुलचा पत्ता कट

टीम इंडियाचा युवा ओपनर शुभमन गिलला कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा पुढचा उपकर्णधार बनवलं जाऊ शकतं. 23 वर्षाचा शुभमन गिल बिनधास्त बॅटिंग करतो. शुभमन गिल टीमचा व्हाइस कॅप्टन झाला, तर केएल राहुलला टीममध्ये स्थान मिळणार नाही. केएल राहुलच्याजागी शुभमन गिल रोहित शर्मासोबत ओपनिंगला उतरेल. त्याशिवाय तो टीमचा उपकर्णधार असेल. शुभमन गिलच टेस्ट क्रिकेटमध्ये भविष्य उज्वल दिसतय. तो टीम इंडियासाठी दीर्घकाळ ओपनिंगची भूमिका बजावू शकतो.

तो आता अवघ्या 25 वर्षांचा

टेस्ट क्रिकेटमध्ये ऋषभ पंतच विकेटकीपर आणि बॅट्समन म्हणून चांगलं प्रदर्शन आहे. त्यामुळे तो सुद्धा उपकर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. ऋषभ पंत आता 25 वर्षांचा असून तो दीर्घकाळ टीमच उपकर्णधारपद भुषवू शकतो. ऋषभ पंत वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये फ्लॉप बॅट्समन आहे. पण टेस्ट क्रिकेटमध्ये पंत टीम इंडियाचा मॅच विनर आहे.

फक्त 10 सामन्यात त्याची लक्षवेधी कामगिरी

श्रेयस अय्यर आतापर्यंत भारतासाठी 10 कसोटी सामने खेळलाय. त्यात त्याने 44.40 च्या सरासरीने 666 धावा केल्यात. श्रेयस अय्यरने टेस्ट क्रिकेटमध्ये भारतासाठी एक सेंच्युरी आणि 5 हाफ सेंच्युरी झळकवल्या आहेत. श्रेयस मधल्याफळीत खेळतो. तो उपकर्णधार बनण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. 28 वर्षाच्या श्रेयसने भारताच्या कसोटी संघात आपल स्थान पक्क केलय. टेस्टमध्ये श्रेयस अय्यर 6 व्या नंबरवर बॅटिंग करतो.