लंडन : इंग्लंडचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी कोरोनाशी संबधित प्रतिबंधाबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये सुरु होणारी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका प्रेक्षकांच्य़ा आवाजाने दुमदुमणार आहे. 5 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत पहिला सामना 4 ऑगस्टला सुरु होईल. या नव्या घोषणेमुळे आता सर्व मैदानात प्रत्येक चौकार, षटकार आणि विकेटनंतर प्रेक्षकांच्या टाळ्या आणि आवाजाने सर्व मैदान घुमणार आहे.
जूनमध्ये झालेला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना साउदप्टन येथे मर्यादित प्रेक्षकांच्या उपस्थितित रंगला होता. पण भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेसाठी हे निर्बंध हटवत प्रेक्षकांना परवानगी देण्यात आल्याने आता मैदानात प्रेक्षकांची दंगामस्ती पाहायला मिळणार आहे. सध्या दोन्ही संघाचे खेळाडू ब्रेकवर असून सरावासाछी 14 जुलैला खेळाडू एकत्र जमणार आहेत.
ब्रिटेन सरकारने 5 जुलै रोजी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या संकटामुळे लावण्यात आलेले निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 19 जुलैपासून सर्व खेळांच्या मैदानात प्रेक्षकांना संपूर्ण क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी सामाजिक अंतर, मास्क वापरणे हे नियम अनिवार्य असतील. ब्रिटिश सरकारने दिलेल्या माहितीत त्यांनी म्हटंल की, ”चौथ्या टप्प्यात आम्ही इनडोर आणि आऊटडोर अशा सर्व प्रकारच्या सभांना परवानगी दिली आहे. सर्व प्रकारचे व्यापार, नाइट क्लबवरील बॅनही हटवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक आता थिएटर, स्पोर्ट्स इवेंटना जाऊ शकणार आहेत.
मागील वर्षी मार्चमध्ये कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे इंग्लंड सरकारने खेळांच्या मैदानावर प्रेक्षकांच्या प्रवेशावर निर्बंध लावले होते. आता हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. दरम्यान ट्रायलच्या दृष्टीने सरकारने विम्बलडनच्या अतिंम सामन्यात प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.
कधी अर्धशतकाहून अधिक धावा न करणाऱ्या खेळाडूने ठोकलं दुहेरी शतक, भारतीय संघावर मिळवला दमदार विजय
भारत विरुद्ध श्रीलंका सामने सुरु होण्याआधीच ‘या’ खेळाडूचे निलंबन, लाखो रुपयांचा दंड ठोठावत कारवाई
(For Upcoming India Vs England Test Series People are allowed to watch match so stadium will be full of Cricket lover Crowd)