मुंबई : आगामी टी-20 विश्वचषकाला(ICC T20 World Cup) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. आता या स्पर्धेला अवघे काही दिवस राहिल्याने आयसीसीने (ICC) देखील सहभागी होणाऱ्या सर्व 16 संघाच्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडियाच्या (Team India) 15 सदस्यीय संघाचाही समावेश आहे. दरम्यान आयसीसीने ही यादी जाहीर केली असली तरी भारत हा थेट सुपर-12 मध्ये उतरणाऱ्या संघामधील एक असल्याने 15 ऑक्टोबरपर्यंत संघात बदल करु शकतो.
दरम्यान आयसीसीने सर्व संघाची जर्सी त्यांच्या फॅन्ससाठी विकत घेण्याची सुविधाही त्यांच्या संकेतस्थळावर करुन दिली आहे. विशेष म्हणजे या आगामी टी20 विश्व चषकासाठी टीम इंडिया नव्या जर्सीमध्ये दिसणार आहे. 13 ऑक्टोबर रोजी ही जर्सी लॉन्च केली जाणार आहे. आता संघाना बदल करण्यासाठी केवळ 4 दिवस उरल्याने भारतीय संघ काही बदल करणार का? हे पाहावे लागेल.
? ? T-shirts, masks, caps and more!
The official ICC Men’s #T20WorldCup store for the #OfficialFan is open ?
? https://t.co/Rzu9rBAzq5 pic.twitter.com/0iiAlRwDwk
— ICC (@ICC) October 11, 2021
आयसीसीकडे विश्वचषकासाठी संघ पाठवण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर आहे. वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या भारतीय संघातील काही खेळाडू अलीकडेच IPL-2021 मध्ये खेळून मोकळे झाले आहेत, तर काही अजूनही खेळत आहेत. यामध्ये हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नावाची मोठी चर्चा आहे कारण त्याने गोलंदाजी न करणे हा चिंतेचा विषय आहे. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, निवडकर्ते पंड्याबाबाबत अद्याप विचारात आहेत आणि तो गोलंदाज म्हणून संघात राहील की नाही याचा विचार करत आहेत. तसेच संघात अतिरिक्त वेगवान गोलंदाज जोडण्याचा विचार केला जात आहे.
क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत. भारताने संघ जाहीर केला असून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं आहे. धोनीला हे पद सोपवत भारताने एक नवा डाव खेळला असून सर्वांचे लक्ष भारताच्या विश्वचषक कामगिरीकडे लागले आहे.
भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर
भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-
इतर बातम्या
The King is Back! जगातला बेस्ट फिनिशर परतला, धोनीची मॅचविनिंग खेळी पाहून विराट कोहली खूश
DC vs CSK : चेन्नई नवव्यांदा फायनलमध्ये, धोनीने धुतलं, ऋतुराज-उथप्पाचा धमाका, दिल्ली हरली!
(For Upcoming T 20 world cup 2021 ICC Released the list of players of all 16 teams)