नवी दिल्ली : यंदा वनडे वर्ल्ड कप होणार आहे. भारताकडे वर्ल्ड कपच यजमानपद आहे. आयसीसीच्या या टुर्नामेंटमध्ये रोहित शर्मासोबत शुभमन गिल डावाची सुरुवात करेल, असा बहुतांश जणांचा अंदाज आहे. पण अजून एका प्लेयरने आपल्या परफॉर्मन्सने सिलेक्टर्सच लक्ष वेधून घेतलय. IPL 2023 मध्ये या खेळाडूने आपल्या बॅटची ताकत दाखवून दिलीय. शुभमन गिल सुद्धा चालू आयपीएल सीजनमध्ये दमदार कामगिरी करतोय, या बद्दल कुठलीही शंका नाही.
पण शुभमन गिलप्रमाणे तो सुद्धा ओपनिंगच्या जागेसाठी प्रबळ दावेदार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मोठी इनिंग खेळण्याची क्षमता आहे. फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला अजून छाप उमटवता आलेली नाहीय.
एका ओव्हरमध्ये सलग 3 सिक्स
आम्ही ज्या खेळाडूबद्दल बोलतोय तो आहे, चेन्नई सुपर किंग्सचा ओपनर ऋतुराज गायकवाड. ऋतुराजने शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 158 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग केली. त्याने 50 चेंडूत 79 धावा फटकावल्या. यात 3 फोर, 7 सिक्स होते. कुलदीप यादवच्या एका ओव्हरमध्ये त्याने सलग 3 सिक्स मारले.
चालू सीजनमध्ये किती धावा केल्या?
ऋतुराज गायकवाड भारतासाठी 1 वनडे आणि 9 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलाय. आयपीएलच्या चालू सीजनमध्ये त्याने 3 अर्धशतक झळकावली आहेत. 45.7 च्या सरासरीने 503 धावा केल्या आहेत. त्याचा सर्वोच्च स्कोर 92 आहे. आयपीएलमध्ये त्याने शतक सुद्धा झळकावल होतं. त्याने T20 आंतरराष्ट्रीय करियरमध्ये सुद्धा अर्धशतक झळकवलय.
आजच्या मॅचमध्ये काय झालं?
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सामना झाला. या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 3 बाद 223 धावा केल्या. सीएसकेच्या टॉप ऑर्डरने आरामात 195 धावा फटकावल्या. त्यानंतर ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा आणि एमएस धोनीने मिळून टीमला 223 धावांपर्यंत पोहोचवलं.
सीएसकेचा ओपनर ऋतुराज गायकवाडने 79 आणि डेवॉन कॉनवेने 87 धावा केल्या. त्याशिवाय शिवम दुबे (22) आणि रवींद्र जाडेजाने 7 चेंडूत 3 चौकार आणि एका सिक्ससह नाबाद 20 धावा केल्या. दिल्लीच्या खलील अहमदने, एनरिक नॉर्खिया आणि चेतन सकारित्याने प्रत्येकी 1-1 विकेट घेतला.