लंडन : सध्या क्रिकेट विश्वात चर्चा आहे ती शुभमन गिलची. टीम इंडियाच्या या युवा प्लेयरचा परफॉर्मन्सच तसा आहे, त्यामुळे त्याची चर्चा होणं स्वाभाविक आहे. मागच्या आठवड्यात संपलेल्या IPL 2023 च्या सीजनमध्ये शुभमनने 800 पेक्षा जास्त धावा केल्या. शुभमन गिलकडे भविष्यातील टीम इंडियाचा स्टार म्हणून पाहिलं जातय. शुभमन गिल क्रिकेट बरोबर सोशल मीडियावरही चर्चेत असतो. त्याच नाव सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर आणि अभिनेत्री सारा अली खान बरोबर जोडलं जातं.
शुभमन बद्दल कितीही गॉसिप केलं, तरी त्याच क्रिकेटींग टॅलेंट स्पेशल आहे. आता टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी सुद्धा हा मुद्दा अधोरेखित केलाय.
शुभमनकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव फार कमी, पण….
शुभमन गिलकडे सध्या इंग्लंडमध्ये फक्त एक टेस्ट मॅच खेळण्याचा अनुभव आहे. ओव्हलच्या मैदानावर तो पहिल्यांदा खेळणार आहे. शुभमनकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा फार अनुभव नसला, तरी तो टीम इंडियाची ताकत आहे. ऑस्ट्रेलियन टीमची तो एकटाच वाट लावू शकतो.
आस-पास सुद्धा कोणी नाही
वर्ष 2022 आणि 2023 मध्ये शुभमन गिलने प्रत्येक फॉर्मेटमध्ये धावा केल्या आहेत. कुठल्याही फॉर्मेटमध्ये खेळताना त्याच्या बॅटिंगची स्टाइल आणि अंदाज तोच असतो. त्याने प्रत्येक फॉर्मेटमध्ये धावा केल्या आहेत. त्याच्या आस-पास सुद्धा कोणी नाहीय.
राहुल द्रविड शुभमनबद्दल काय म्हणाले?
शुभमन गिलचे यावर्षातील आकडे काय आहेत? त्याची माहिती देण्याआधी राहुल द्रविड शुभमन गिलबद्दल काय बोलले? ते जाणून घ्या. द्रविडच्या मते “शुभमन गिल स्टार आहे. त्याच्याकडे क्लास आहे. अंडर 19 च्या दिवसांपासूनच मी शुभमनला पाहतोय. तो खूप खास आहे. टीम इंडियात येऊन त्याला फक्त काही वर्ष झालीयत. पण त्याने स्वत:ची जागा पक्की केलीय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही तो छाप उमटवतोय याचा आनंद आहे”
वर्ष 2023 मध्ये शुभमनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती धावा केल्यात?
वर्ष 2023 मध्ये शुभमन गिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 61.25 च्या सरासरीने 980 धावा केल्या आहेत. यात 5 सेंच्युरी आहेत. कसोटी क्रिकेमध्ये त्याने 154 धावा केल्या आहेत. 2 टेस्टमध्ये त्याने एक सेंच्युरी झळकवलीय. गिलच्या एकूण टेस्ट करीयरवर नजर टाकली, तर त्याने 15 टेस्टमध्ये 2 सेंच्युरीसह 890 धावा केल्यात.