World Cup 2023 : वनडे वर्ल्ड कप 2023 यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. यंदाचा वर्ल्ड कप भारतात होणार आहे. वर्ल्ड कप सुरु व्हायला अजून काही महिन्यांचा कालावधी बाकी आहे. मात्र त्याआधीच ICC च्या या मेगा इव्हेंटमधील विजेत्याबद्दल मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे. वर्ल्ड कपला अजून 7 महिने बाकी आहेत. कुठला संघ यंदा वर्ल्ड कपच विजेतेपद मिळवणार? त्या बद्दल भविष्यवाणी झाली आहे.
भारतात होणारा वर्ल्ड कप कुठली टीम उंचावणार? त्या बद्दल ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट ली ने भविष्यवाणी केली आहे. तो स्पोर्ट्स यारीशी बोलत होता. भारतात होणाऱ्या या वनडे वर्ल्ड कपमध्ये दिग्गज टीम भिडणार आहेत.
कुठली टीम वर्ल्ड कप विजेतेपदाची प्रबळ दावेदार?
न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड या टीम्स विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत. भारताच वर्ल्ड कप विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे, असं ब्रेट ली ने म्हटलय. “वर्ल्ड कपमध्ये भारताला भारतात हरवणं कठीण आहे. टीम इंडियाला भारतीय परिस्थितीबद्दल जास्त माहित आहे. त्यामुळे भारतच वर्ल्ड कप 2023 विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे” असं ब्रेट ली ने म्हटलय.
WTC फायनल कोण जिंकणार?
ब्रेट ली ने वर्ल्ड कपशिवाय 7 जूनपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या विजेत्याबद्दलही भविष्यवाणी केलीय. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये इंग्लंडच्या केनिंगटनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. 7 जून ते 11 जून दरम्यान फायनल होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्याबद्दल ब्रेट ली च वेगळं मत आहे. इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलिया जिंकेल असं ब्रेट ली ला वाटतं.
WTC फायनल कुठे होणार?
“भारताकडे चांगली टीम आहे. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल इंग्लंडच्या ओव्हल मैदानात खेळली जाणार आहे. इथली परिस्थिती ऑस्ट्रेलियाला जास्त अनुकूल आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया जिंकेल असं माझं भाकीत आहे” असं ब्रेट ली म्हणाला.