मुंबई : टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघात बरेच बदल होणार आहेत. कर्णधार कोहली टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असून संघाला एक नवा प्रशिक्षकही मिळणार आहे. बीसीसीआयने बऱ्याच काळापासून मुख्य प्रशिक्षकासह, बोलिंग कोच आणि फिल्डिंग कोच पदासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी रवी शास्त्रीनंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडला संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा होती. पण द्रविडने यामध्ये रस दाखवला नव्हता. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार द्रविडने अधिकृतरित्या या पदासाठी अर्ज केला आहे.
द्रविडने काही दिवसांपूर्वी श्रीलंका दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं होतं. त्यावेळी भारताने विजयही मिळवला होता. तेव्हापासून द्रविडला मुख्य संघाचा हे़ड कोच करण्यात यावं अशा मागणीने जोर धरला होता. पण राहुल द्रविड हा नॅशनल क्रिकेट अॅकेडमीचा (National Cricket Academy) प्रमुख या पदावर असल्याने तो ही संधी घेत नव्हता. त्याला ज्यूनियर स्तरावरील खेळाडूंच्या निवडीसाठी आणि त्यांचा खेळ सुधारण्यासाठी काम करायचं असल्याने तो या पदावर होता. पण आता राहुलने मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्जस दिल्याने नॅशनल क्रिकेट अॅकेडमीचा प्रमुख म्हणून व्हिव्हिएस लक्ष्मण (VVS Laxman) याची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
Rahul Dravid applies for Team India head coach post, VVS Laxman likely to take over at NCA
Read @ANI Story | https://t.co/Uc11S25DuI pic.twitter.com/bMJ0pPkw4h
— ANI Digital (@ani_digital) October 26, 2021
शास्त्रींसह कोचिंग स्टाफमधील बोलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun)हे देखील पदावरुन पायउतार होणार असल्याने त्यांच्या जागी नव्या व्यक्तीची नेमणूक करण्याचे काम सध्या सुरु आहे. या जागेसाठी माजी क्रिकेटपटू असणारे वेगवान गोलंदाज पारस म्हाम्ब्रे (Paras Mhambrey) यांनी अर्ज केला आहे. सोमवारी त्यांनी बीसीसीआयला (BCCI) अर्ज दिल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. म्हाम्ब्रे हे मागील 20 वर्षांपासून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसोबत जोडलेले असून राहुल द्रविड़च्या (Rahul Dravid) निकववर्तीयांपैकी एक आहेत.याबाबत बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘पारस यांनी बोलिंग कोचच्या पदासाठी अर्ज दिला आहे. अर्ज देण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर असून पार हे खूप अनुभवी कोच असून त्यांनी अंडर 19 संघासाठी काम केल्याने त्याचं सिलेक्शन होऊ शकतं.’
कोचिंग स्टाफमधील आणखी एक महत्त्वाचं पद म्हणजे फिल्डिंग कोच. सध्या फिल्डिंग कोच असणारे आर श्रीधरहेही पदावरुन पायउतार होणार असल्याने त्यांच्या जागी नव्या व्यक्तीची नेमणूक करण्यासाठी अर्ज स्वीकारले गेले आहेत. याजागी माजी क्रिकेटपटू अभय शर्मा (Abhay Sharma) यांनी अप्लाय केलं असून ते श्रीधर यांची जागा घेण्याची शक्यता आहे. शर्मा यांनी भारत ए, भारत अंडर-19 आणि राष्ट्रीय महिला संघासोबत काम केलं आहे. दरम्यान श्रीधर यांचा कार्यकाळ टी20 वर्ल्ड कपनंतर संपणार असून त्यावेळी 52 वर्षीय अभय यांना भारतीय क्रिकेट संघासोबत फील्डिंग कोच म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.
इतर बातम्या
‘हा तर इस्लामचा विजय’, पाकिस्तानच्या नेत्याने खेळाला दिला धर्माचा रंग
India vs Pakistan : भारताच्या पराभवानंतर विनोद कांबळी वैतागला, हार्दीकला म्हणतो जाऊन दांडीया खेळ
(Former cricketer Rahul dravid has Officially applied for the post of team india head coach)