मुंबई : वर्ल्ड कप 2023 स्पर्धा सुरु व्हायला तीन महिने उरले आहेत. टुर्नामेंटच्या शेड्युलची घोषणा झाली आहे. सर्वच टीम्स वर्ल्ड कपच्या तयारीला लागल्या आहेत. भारतीय टीम सुद्धा अपवाद नाहीय. टीम इंडिया या टुर्नामेंटच्या आधी जवळपास 12 सामने खेळणार आहे. त्यानंतर वर्ल्ड कपसाठी स्क्वाड सिलेक्शन होईल. बीसीसीआयसमोर आता टीम सिलेक्शनआधी आणखी एक सिलेक्शनचा विषय आहे.
हे सिलेक्शन आहे चीफ सिलेक्टर पोस्टसाठी. त्यासाठी योग्य उमेदवाराचा शोध सुरु आहे. या शर्यतीत एका मुंबईकर क्रिकेटपटूच नाव आघाडीवर आहे.
बीसीसीआयने मागवले अर्ज
मागच्या 4 महिन्यापासून बीसीसीआयच्या सिनियर पुरुष सिलेक्शन कमिटीमध्ये मुख्य निवडकर्त्याची पोस्ट खाली आहे. चेतन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर कोणाचीही या पदावर नियुक्ती झालेली नाही. पाच सदस्यांची सिलेक्शन कमिटी फक्त 4 सिलेक्टर्सवर काम करतेय. अलीकडेच बीसीसीआयने हे पद भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत.
दोघांची नाव चर्चेत
पाचव्या मुख्य सिलेक्टर पदासाठी आता अजित आगरकर यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. या नव्या सदस्याला मुख्य निवडकर्ता बनवण्यात येईल. मागच्या काही दिवसांपासून या बद्दल विविध अंदाज वर्तवले जात आहेत. यात स्टार ओपनर विरेंद्र सेहवागच नावही चर्चेत आहे.
सध्या त्यांच्यावर कुठली जबाबदारी आहे?
भारताचे माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांची चीफ सिलेक्टर पदावर निवड होऊ शकते, असं पीटीआयने वृत्त दिलं आहे. आगारकर आता 45 वर्षांचे आहेत. दोन वर्षांपूर्वी सुद्धा या पदासाठी त्यांचं नाव चर्चेत होतं. आता आगरकर यांची निवड निश्चित मानली जात आहे. सध्या ते आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स टीमचे गोलंदाजी कोच आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कशी कामगिरी आहे?
अजित आगरकर यांच्याकडे टीम इंडियाकडून खेळण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी 26 कसोटी सामन्याl 58 विकेट घेतल्या आहेत. 191 वनडे सामन्यात 288 विकेट त्यांच्या नावावर आहेत. 4 T20 सामने सुद्धा ते खेळले आहेत. 2007 साली वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचा ते भाग होते. अजित आगरकर यांच्या दीर्घ अनुभवाचा टीम इंडियाला निश्चित टीम निवडीमध्ये फायदा होऊ शकतो.
? NEWS ?
BCCI invites applications for one member of Men’s Selection Committee post.
Details ?https://t.co/jOU7ZIwdsl
— BCCI (@BCCI) June 22, 2023
निवडीची प्रोसेस काय असेल?
30 जून पर्यंत या पोस्टसाठी अप्लाय करता येईल. त्यानंतर 1 जुलैला इंटरव्ह्यू होईल. हा इंटरव्ह्यू तीन सदस्यांची एडवायजरी कमिटी घेईल. ही कमिटी सिलेक्शनशिवाय भारतीय टीमसाठी कोच निवडते.
हेड कोचवर होणार निर्णय
सीएससी शुक्रवारी 30 जूनला भारतीय महिला टीमचा हेड कोच ठरवण्यासाठी सुद्धा मुलाखती घेणार आहे. या पोस्टसाठी मुंबईचे दिग्गज फलंदाज अमोल मुजूमदार आणि भारतीय टीमचे माजी कोच तुषार अरोठे आहेत. त्याशिवाय इंग्लंडचे माजी क्रिकेटर जॉन लुइस सुद्धा दावेदार आहेत.