Sunil Gavaskar Statement : माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माच्या एका कृतीवर भडकले आहेत. रोहित शर्मावर संतापून सुनील गावस्कर यांनी एक विधान केलय. भारतीय फॅन्स आणि रोहित शर्मा हे विधान कधीच विसरणार नाही. अलीकडेच टीम इंडियाला मायदेशात ऑस्ट्रेलियाकडून 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीजमध्ये पराभव झाल्यानंतर सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माबद्दल विधान केलय.
मनाला लागेल असं गावस्कर रोहितबद्दल बोलले. सुनील गावस्कर यांनी थेट रोहित शर्माच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. रोहित शर्मा अलीकडेच मेहुण्याच लग्न असल्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात खेळला नाही. याच मुद्यावरुन सुनील गावस्कर यांनी रोहित शर्मावर बरीच टीका केली.
सुनील गावस्करांच म्हणण काय?
सुनील गावस्कर यांनी अचानक रोहित शर्माबद्दल संताप व्यक्त केला. “आम्हाला असा कॅप्टन नकोय, जो एक मॅच खेळेल आणि बाकी सामन्यात गायब राहिलं” असं सुनील गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाले. यावर्षी भारतातच 2023 वनडे वर्ल्ड कप होणार आहे. त्यापूर्वी रोहित शर्माने सर्व वनडे सामने खेळले पाहिजेत, असं गावस्करांच मत आहे.
तुम्हाला असा कॅप्टन नकोय, जो…
सुनील गावस्कर यांच्या मते “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इमरजन्सीशिवाय फॅमिली कमिटमेंटला स्थान नाहीय. एका कॅप्टनला प्रत्येकवेळी प्रत्येक मॅचसाठी आपल्या टीमसोबत उपलब्ध असलं पाहिजे. रोहित शर्माने प्रत्येक सामना खेळला पाहिजे. तुम्हाला असा कॅप्टन नकोय, जो एक मॅच खेळेल. बाकी सामन्यांसाठी उपलब्ध नसेल. हे कुठल्या दुसऱ्या खेळाडूसोबत सुद्धा असं होऊ शकतं. कौटुंबिक कारणांमुळे तो खेळला नाही हे मला माहितीय” असं सुनील गावस्कर म्हणाले.
तेव्हा कुटुंबाला मागे सोडा
“वर्ल्ड कपचा विषय येतो, तेव्हा कुटुंबाला मागे सोडलं पाहिजे. तुम्ही सर्व गोष्टी आधी करुन घ्या. कुठल्याही इमरजन्सीशिवाय मॅच मिस करु नका. कुठली इमरजन्सी येते, तेव्हा गोष्ट वेगळी असते. कॅप्टनशिपमध्ये सातत्य आवश्यक असतं” असं सुनील गावस्कर म्हणाले.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या वडने सामन्यात रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याने नेतृत्व केलं होतं. हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्या वनडेमध्ये विजय मिळवला. रोहित लग्नावरुन परतल्यानंतर सलग दोन वनडेमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेत 2-1 ने पराभव झाला.