नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेपटूंमध्ये अनेकदा वाद होतात. दोन्ही देशांचे क्रिकेटपटू अनेकदा मीडियामध्ये वक्तव्य करत असतात. दरम्यान टीम इंडियाचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवागच एक वक्तव्य समोर आलय. सेहवागने पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजावर पलटवार केला असून त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलय. वीरेंद्र सेहवाग पाकिस्ताच्या शोएब अख्तरबद्दल बोलला आहे.
शोएबच्या नोटांपेक्षा माझ्या डोक्यावर जास्त केस आहेत, असं वीरेंद्र सेहवागने म्हटलं आहे. काही काळापूर्वी शोएब अख्तरने वीरेंद्र सेहवागच्या केसांबद्दल वक्तव्य केलं होतं. आता सेहवागने एका यु ट्यूब शो मध्ये पलटवार केलाय.
शोएब अख्तर काय म्हणाला होता?
“सेहवागच्या डोक्यावर जितके केस आहेत, त्यापेक्षा माझ्याकडे जास्त नोटा आहेत” असं शोएब अख्तर काही दिवसांपूर्वी म्हणाला होता. त्यावर आता, ‘तुझ्या नोटांपेक्षा माझ्याकडे जास्त केस आहेत’ असं प्रत्युत्तर वीरेंद्रे सेहवागने दिलय. सेहवाने ही सर्व मजा-मस्ती असल्याच सांगितलं. “आम्ही परस्परांचे पाय खेचत असतो. आमची चांगली मैत्री झाली. आम्ही तिथे गेलो, ते इथे आले. जिथे प्रेम असतं, तिथे मजा-मस्ती सुरु असते” असं सेहवाग म्हणाला.
दोघांत महत्वाच योगदान
शोएब अख्तर आणि वीरेंद्र सेहवाग दोघांनी आपल्या देशाच्या क्रिकेटसाठी महत्वाच योगदान दिलय. सेहवाग आपल्या आक्रमक बॅटिंगसाठी ओळखला जायचा. शोएब अख्तर आपल्या घातक गोलंदाजीसाठी ओळखला जायचा. भारतासाठी 104 कसोटी सामने खेळताना वीरेंद्र सेहवागने 8586 धावा केल्या. त्याने 251 वनडे सामन्यात 8273 धावा केल्या. 19 टी 20 सामन्यात 145.38 च्या स्ट्राइक रेटने 394 धावा केल्या.