नवी दिल्ली : आयपीएल 2023 मध्ये 51 वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला गेला. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये ही मॅच झाली. गुजरातने ही मॅच आरामात जिंकली. लखनौचा या सामन्यात 56 धावांन दारुण पराभव झाला. गुजरात टायटन्सचा ओपनर शुभमन गिलची बॅट या मॅचमध्ये तळपली. त्याने चांगल्या धावा केल्या. गिलने एलएसजीच्या बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला.
स्टार बॅट्समन शुभमन गिलने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 51 चेंडूत नाबाद 94 धावा फटकावल्या. त्याने 184 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग केली. त्याने 7 सिक्स आणि 2 फोर मारले. गिलने शेवटपर्यंत बॅटिंग करुन लखनौच्या बॉलिंगची वाट लावली. थोडक्यात त्याचं, आयपीएलमधील पहिलं शतक हुकलं.
वीरेंद्र सेहवाग त्याच्यावर खूश नाहीय
शुभमन गिलला कोण आऊट करु शकेल? असं वाटत नव्हतं. गिल सध्या रेड हॉट फॉर्ममध्ये आहे. शुभमन गिल इतका चांगला खेळतोय. पण, तरीही टीम इंडियाचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवाग त्याच्यावर खूश नाहीय. गिलने अजून चांगला खेळ दाखवला पाहिजे, असं सेहवागने म्हटलय.
वीरेंद्र सेहवाग गिलबद्दल काय म्हणाला?
गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्याआधी वीरेंद्र सेहवागने शुभमन गिलच्या फॉर्मबद्दल क्रिकबजवर एक मोठं विधान केलं. “10 सामन्यात शुभमन गिलच्या 375 नाही, तर 550 धावा व्हायला पाहिजे होत्या. तो टीम इंडियासाठी सर्व फॉर्मेटमध्ये खेळलाय. मोठा स्कोर सुद्धा त्याने केलाय. शुभमन गिलने आपल्या फॉर्मचा चांगला वापर केला पाहिजे. आयपीएलचा हा सीजन संपेपर्यंत शुभमन गिलच्या 600-700 धावा झाल्या पाहिजेत” असं वीरेंद्र सेहवाग म्हणाला.
हे वक्तव्य मॅचच्या आधीच
सेहवागच हे वक्तव्य मॅचच्या आधीच आहे. गिलने लखनौ विरुद्धच्या सामन्यात 94 धावा फटकावल्या. निश्चितच गिलचा खेळ पाहून सेहवागला बर वाटलं असेल.
आयपीएल 2023 मध्ये गिलने किती धावा केल्यात?
24 वर्षीय शुभमन गिलने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत शानदार प्रदर्शन केलय. या सीजनमध्ये 11 सामन्यात त्याने 143 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना 469 धावा केल्या आहेत. आयपीएल 2023 मध्ये त्याने 4 हाफ सेंच्युरी झळकवल्या आहेत.