Virat Kohli : आता ‘या’ खेळाडूने विराट कोहलीवर ठेवला स्वार्थी असल्याचा ठपका

| Updated on: Jun 21, 2024 | 1:55 PM

Virat Kohli : विराट कोहलीवर पुन्हा एकदा स्वार्थी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चालू T20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीला अजून पर्यंत लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. काल अफगाणिस्तान विरुद्ध कोहलीने 24 चेंडूत 24 धावा केल्या. यात फक्त 1 सिक्स होती.

Virat Kohli : आता या खेळाडूने विराट कोहलीवर ठेवला स्वार्थी असल्याचा ठपका
Virat Kohli
Follow us on

मागच्यावर्षी वनडे वर्ल्ड कप झाला. त्यावेळी भारताकडून विराट कोहलीने सर्वोत्तम प्रदर्शन केलं होतं. त्याने वनडे वर्ल्ड कपमध्ये एकूण 765 धावा केल्या. तीन शतक आमि सहा अर्धशतक झळकावली होती. कोहलीने त्याच्याबाजूने सर्वोत्तम कामगिरी केली होती. या प्रदर्शनामुळेच टीम इंडियाने वर्ल्ड कपचे सर्वच्या सर्व 10 सामने जिंकले. अपवाद फक्त फायनलचा. ऑस्ट्रेलियाने महत्त्वाच्या लढतीत टीम इंडियाला नमवून वर्ल्ड कपच विजेतेपद पटकावल होतं. आजही पराभवाच्या त्या आठवणी भारतीयांच्या मनात ताज्य आहेत. या वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या कामगिरीची आढावा घेताना नेहमीच कोहलीच्या प्रदर्शनाची दखल घेतली जाईल. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हफीजने याच कोहलीच्या प्रदर्शनावरुन वाद निर्माण होईल असं वक्तव्य केलं आहे.

त्याने विराट कोहलीच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळीची आठवण करुन दिली. विराट कोहलीने त्या सामन्यात 121 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या होत्या. भारताने निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 5 बाद 326 धावा केल्या. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी त्या मॅचमध्ये दमदार बॉलिंग केली. दक्षिण आफ्रिकेचा डाव 83 धावांवर आटोपला. मोहम्मद हफीजच्या मते त्या मॅचमध्ये 49 व्या षटकात विराटच सर्व लक्ष रेकॉर्ड सेंच्युरी करण्याकडे लागलेलं. त्या शतकामुळे विराटला सचिनच्या वनडेमधील 49 शतकांशी बरोबरी करता आली.

पॉडकास्टमध्ये त्या वक्तव्याची आठवण करुन देण्यात आली

“मला त्यावेळी विराट कोहलीच्या बॅटिंगमुळे स्वार्थीपणा दिसला. वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्यांदा असं घडलं. 49 व्या ओव्हरमध्ये त्याने सेंच्युरीसाठी एकेरी धाव पळून काढली. त्याने टीमचा आधी विचार केला नाही” असं हाफीज एका क्रिकेट टॉक शो मध्ये म्हणाला. मायकल वॉन आणि एडम गिलिख्रिस्ट यांच्यासोबत एका पॉडकास्टमध्ये हाफीजला त्याच्या वक्तव्याची आठवण करुन देण्यात आली. वॉनने हाफीच्या कमेंटवर आक्षेप घेतला. पण मोहम्मद हफीज अनेक महिन्यानंतरही त्याच्या वक्तव्यावर ठाम राहिला. सध्या सुरु असलेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली प्रभावी कामगिरी करु शकलेला नाही. त्याने पहिल्या तीन सामन्यात फक्त 5 धावा केल्या होत्या. काल अफगाणिस्तान विरुद्ध सुपर 8 सामन्यात विराटने 24 चेंडूत 24 धावा केल्या. फक्त त्याने एक सिक्स मारला.