लाहोर : वर्ल्ड कप 2023 मधील भारत-पाकिस्तान या बहुचर्चित सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्धची विजयी परंपरा भारताने कायम ठेवली. या मॅचनंतर विराट कोहलीने पाकिस्तानी कॅप्टन बाबर आजमला एक टीशर्ट गिफ्ट केलं. त्यावर विराट कोहलीची स्वाक्षरी होती. विराट कोहलीच्या या कृतीची सोशल मीडियावर भरपूर चर्चा होतेय. भारतीय चाहते याबद्दल कोहलीच कौतुक करतायत. खरंतर ही खूप चांगली गोष्ट आहे. एका क्रिकेटपटूने दुसऱ्या क्रिकेटरला गिफ्ट केलं. पण पाकिस्तानचा माजी कॅप्टन वसीम अक्रमला हे अजिबात आवडलेलं नाही. अक्रमने यावर आपली नाराजी प्रगट केली. भारताकडून मॅच हरल्यानंतर बाबरने मैदानातच कोहलीकडून जर्सीच गिफ्ट स्वीकारलं. अक्रमला हीच गोष्ट आवडली नाही. आज गिफ्ट स्वीकारण्याच दिवस नव्हता, असं अक्रमने म्हटलय.
वसीम अक्रम वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी टीव्ही चॅनलच्या एक्सपर्ट पॅनलचा भाग आहे. जेव्हा एका पाकिस्तानी चाहत्याने अक्रमला बाबरने कोहलीकडून स्वीकारलेल्या गिफ्टबद्दल प्रश्न विचारला, त्यावर आक्रमने नाराजी व्यक्त केली. एका चाहत्याने आक्रमला प्रश्न विचारला. “बाबर आजमने विराट कोहलीकडून दोन टी-शर्ट घेतली. प्रत्येक टीव्ही चॅनलने हा व्हिडिओ दाखवला. ज्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने मॅच हरलात, पाकिस्तानी फॅन्स दु:खी आहेत. त्यावेळी ही बाब बाबरने खासगी ठेवायला पाहिजे होती”
Wasim Akram says “Babar Azam shouldn’t have asked Virat Kohli his Tshirt”pic.twitter.com/KREc7H41Pm#INDvsPAK #indvspak2023 #Rizwan #RohitSharma𓃵 #IndiaVsPakistan #CWC23 #ICCCricketWorldCup23 pic.twitter.com/NEhiFEzEMp
— ICT Fan (@Delphy06) October 14, 2023
‘आज हा दिवस नव्हता’
वसीम अक्रमने सुद्ध फॅनच्या भावनेशी सहमती दाखवली. “आज हा दिवस नव्हता. तुम्ही एक मोठी मॅच गमावल्यानंतर अशा प्रकारे टी-शर्ट स्वीकारण योग्य नाही. जेव्हा मी हे दृश्य पाहिलं, तेव्हा माझी सुद्धा हीच भावना होती. जर तुम्हला असं करायचच होतं, तुम्हाला तुमच्या काकाच्या मुलाने कोहलीच टी-शर्ट आणायला सांगितलं होतं, तर मॅचनंतर तुम्ही ड्रेसिंग रुममध्ये जायला पाहिजे होतं. सार्वजनिकरित्या असं करण्याची गरज नव्हती” असं अक्रम म्हणाला.