Shoaib Akhtar – शोएब अख्तरची सटकली, स्वत:च्या बायोपिकबद्दल घेतला मोठा निर्णय

| Updated on: Jan 22, 2023 | 11:30 AM

Shoaib Akhtar - काही महिन्यांपूर्वी शोएब अख्तरच्या आयुष्यावर बायोपिक येत असल्याची घोषणा झाली होती. स्वत: शोएबने या निर्णयाची माहिती दिली होती. पण आता शोएबने त्याच्या बायोपिकबद्दल वेगळा निर्णय घेतलाय.

Shoaib Akhtar - शोएब अख्तरची सटकली, स्वत:च्या बायोपिकबद्दल घेतला मोठा निर्णय
Shoaib akthar-umar jaiswal
Image Credit source: instagram
Follow us on

लाहोर – पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज शोएब अख्तर नेहमीच चर्चेत असतो. क्रिकेट, भारतीय क्रिकेटर्ससंदर्भात तो नेहमीच वेगवेगळ्या कमेंटस करत असतो. काही महिन्यांपूर्वी शोएब अख्तरच्या आयुष्यावर बायोपिक येत असल्याची घोषणा झाली होती. स्वत: शोएबने या निर्णयाची माहिती दिली होती. पण आता शोएबने त्याच्या बायोपिकबद्दल वेगळा निर्णय घेतलाय. त्यामुळे सगळेच चक्रावून गेले आहेत. शोएबने आता ‘रावळपिंडी एक्सप्रेस रनिंग अगेंस्ट द ऑड्स’ या चित्रपटातून अंग काढून घेतलय. आपला आता या चित्रपटाशी कुठलाही संबंध नसल्याच त्याने जाहीर केलय. सोशल मीडियावर शोएबने ही माहिती दिलीय.

शोएबने निर्णयामागचं कारण सांगितलय

हे सुद्धा वाचा

‘रावळपिंडी एक्सप्रेस रनिंग अगेंस्ट द ऑड्स’ या चित्रपटाशी संबंध नसल्याचे शोएबने जाहीर केलय. काही महिने विचार केल्यानंतर हा कठोर निर्णय घेतल्याच शोएब अख्तर म्हणाला. काही वर्षांपूर्वी शोएब अख्तरने आपल्या वेगाने स्वत:ची दहशत निर्माण केली होती. शोएब अख्तरने आता बायोपिकपासून वेगळं होण्यामागच कारण सुद्धा सांगितलय.

आयुष्यावर बायोपिक हे माझं एक स्वप्न होतं

शोएब अख्तरने मॅनेजमेंट आणि लीगल टीमच्या माध्यमातून करार संपवल्याच जाहीर केलय. ” गोष्टी योग्य पद्धतीने सुरु नव्हत्या. कराराच्या अटींच सातत्याने उल्लंघन सुरु होतं. त्यामुळे बायोपिकचा करार रद्द करावा लागला” असं शोएब अख्तरने सांगितलं. “स्वत:च्या आयुष्यावर बायोपिक हे माझं एक स्वप्न होतं. हा करार टिकवून ठेवण्याचा मी माझ्या बाजूने सर्व प्रयत्न केले. पण दुर्देवाने गोष्टी योग्य घडल्या नाहीत. परिणामी करार संपुष्टात आला” असं शोएब अख्तर म्हणाला.


कायदेशीर कारवाईचा इशारा

बायोपिकचे अधिकार रद्द करण्याच्या सर्व कायदेशीर प्रोटोकॉलच पालन केल्यानंतर करारापासून स्वत:ला वेगळ केलय असं शोएब अख्तर म्हणाला. करार रद्द झाल्यानंतरही निर्मात्याने काम सुरु ठेवलं, त्याच्या नावाचा वापर केला, तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शोएबने निर्मात्या दिलाय.

कधी रिलीज होणार होता चित्रपट?

शोएब अख्तरने मागच्यावर्षी जुलै महिन्यात सोशल मीडियावर बायोपिकचा मोशन पोस्टर रिलीज केला होता. 13 नोव्हेंबर 2023 ला चित्रपट रिलीज होईल, अशी माहिती दिली होती. पण असं होण आता अशक्य आहे. शोएब अख्तरने 46 टेस्ट, 163 वनडे आणि 15 T20 सामन्यात पाकिस्तानच प्रतिनिधीत्व केलं. शोएब अख्तरच्या नावावर कसोटीत 178 विकेट, वनडेमध्ये 247 आणि T20 मध्ये 19 विकेट आहेत.