मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडिया उत्तम कामगिरी करतेय. रोहितच्या टीमने टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. सगळ्याच मॅचमध्ये विजय मिळवलाय. 14 पॉइंट्ससह टीम इंडिया टॉपवर आहे. टीम इंडियाने गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध सातवा सामना जिंकला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना झाला. टीम इंडियाने 302 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाच्या विजयात मोहम्मह सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या तीन वेगवान गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तिघांनी मिळून 9 विकेट काढले. शमीने 5, सिराजने 3 आणि बुमराहला एक विकेट मिळाला.
भारताची ही बळकट गोलंदाजी पाहून पाकिस्तानात पोटदुखी सुरु झालीय. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन रजाने मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजला सोपवल्या जाणाऱ्या चेंडूची चौकशीची मागणी केली आहे. पाकिस्तानी न्यूज चॅनलच्या एका शो मध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं. शो मध्ये अँकरने हसन रजा यांना प्रश्न विचारला. चेंडू वेगळे असतात का?. कारण भारतीय गोलंदाजांना ज्या पद्धतीचा स्विंग मिळतोय, ते पाहून असं वाटतय की, ते बॉलिंग पीचवर गोलंदाजी करतायत. त्यांना खूप चांगला स्विंग मिळतो.
Is it a serious cricket show? If not, please mention ‘satire’ ‘comedy’ in English somewhere. I mean…it might be written in Urdu already but unfortunately, I can’t read/understand it. 🙏🏽 https://t.co/BXnmCpgbXy
— Aakash Chopra (@cricketaakash) November 3, 2023
तो फार मोठा क्रिकेटर नाहीय
“टीम इंडियाची गोलंदाजी सुरु होते, तेव्हा DRS चा निर्णयही भारताच्या बाजूने होतो. 7-8 DRS खूप क्लोज होते. त्याचा निर्णय भारताच्या बाजूने लागला. गोलंदाजीबद्दल बोलायच झाल्यास शमी-सिराज एलन डोनाल्ड, एनटिनी इतके घातक झालेत. मला वाटतं की, दुसऱ्या इनिंगमध्ये चेंडू सुद्धा बदलतो. चेंडूची तपासणी झाली पाहिजे” असं हसन रजाने म्हटलं. भारतीय गोलंदाजांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हसन रजा फार मोठा क्रिकेटर नाहीय. त्याने फक्त 7 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. यात 27 च्या सरासरीने 235 धावा केल्यात. 16 वनडेमध्ये 242 धावा त्याच्या नावावर आहेत.