मुंबई: भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्याला आहे. विजय मल्ल्या (Vijay Mallya) आपल्या ऐशोआरामी लाईफस्टाइलसाठी ओळखला जायचा. मद्य सम्राट अशी त्याची ओळख होती. हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे पुढे त्याची कारकीर्द उतरणीला लागली. याच विजय मल्ल्याया क्रिकेट, फॉर्म्य़ुला 1 मध्येही रस होता. आयपीएलमधल्या (IPL) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाची मालकी विजय मल्ल्याकडे होती. या टीम मधील ख्रिस गेल हा त्याचा आवडता खेळाडू. नुकतीच विजय मल्ल्याने लंडनमध्ये ख्रिस गेलची (Chris Gayle) भेट घेतली. मल्ल्या सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्याला आहे. ख्रिस गेल सुद्धा सध्या फ्री आहे. तो लंडनमध्ये आला होता. त्यावेळी विजय मल्ल्याने त्याची भेट घेतली. विजय मल्ल्याने बुधवारी टि्वटरवरुन दोघांच्या भेटीचा फोटो पोस्ट केला.
Great to catch up with my good friend Christopher Henry Gayle @henrygayle , the Universe Boss. Super friendship since I recruited him for RCB. Best acquisition of a player ever. pic.twitter.com/X5Ny9d6n6t
हे सुद्धा वाचा— Vijay Mallya (@TheVijayMallya) June 22, 2022
“माझा मित्र युनिव्हर्स बॉस ख्रिस्तोफर हेनरी गेलला भेटून आनंद झाला. ख्रिस गेलला RCB च्या संघात घेतल्यापासून आमची चांगली मैत्री आहे. कुठल्याही खेळाडूच केलेलं हे सर्वोत्तम अधिग्रहण आहे” असं मल्ल्याने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. हे टि्वट लगेच व्हायरल झालं व त्याला हजारो लाइक्सही मिळाले. 2011 ते 2017 पर्यंत ख्रिस गेल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाकडून खेळला. तो या काळात आरसीबीसाठी अनेक संस्मरणीय इनिंग्स खेळला.
Kabhi apne dusre best friend @TheOfficialSBI se bhi mil liya karo
— Kisslay Jha?? (@TrollerBabua) June 22, 2022
RCB कडून आयपीएलमध्ये खेळतान ख्रिस गेलने 91 सामन्यात 154.40 च्या स्ट्राइक रेटने 3420 धावा केल्या. यात 21 अर्धशतक आणि पाच शतक आहेत. गेलने आरसीबीकडून खेळतानाच नाबाद 175 धावा केल्या होत्या. आरसीबीची साथ सोडल्यानंतर गेल पंजाब किंग्सकडून खेळला. IPL 2022 मेगा ऑक्शनमध्ये तो सहभागी झाला नव्हता. मात्र आयपीएल 2023 मध्ये ख्रिस गेल खेळताना दिसू शकतो.
.T.I.M.E. pic.twitter.com/CxELUXMWjg
— Jethalal? (@jethalal_babita) June 22, 2022
विजय मल्ल्याने हा फोटो पोस्ट केल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आलय. कधीतरी असाच वेळ काढून आपले बेस्ट फ्रेंड स्टेट बँक ऑफ इंडिया वाल्यांनाही भेटून घे असं एका युझरने कमेंटमध्ये म्हटलं आहे.