मुंबई: श्रीलंकेने (Srilanka) 1996 साली वर्ल्ड कप (1996 World cup Win) जिंकला. श्रीलंकेच्या या ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयात रोशन महानामा (Roshan Mahanama) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. हेच रोशन महानामन श्रीलंकेत रस्त्यावर उतरुन लोकांसाठी चहाचं वाटप करताना दिसले. एकेकाळच्या या दिग्गज खेळाडूच्या हातात चहाचा ट्रे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. रोशन महानामा यांनी सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यात ते पेट्रोल पंपावर रांगेत उभ्या असलेल्या लोकांना चहा आणि पावाचे वाटप करताना दिसतायत. सध्या श्रीलंका आर्थिक संकटात आहे. भोजन, इंधन आणि औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जनता त्रस्त आहे. तिथले लोक रस्त्यावर उतरलेत. श्रीलंकेत खूपच भीषण परिस्थिती आहे. पेट्रोल पंपावर लोकांची लांबलचक रांग लागली आहे. या आर्थिक संकटात अनेक जण मदतीसाठी पुढे येत आहेत. रोशन महानामा पेट्रोल पंपावर रांगेत उभ्या असलेल्या लोकांना चहा पाजली.
वार्ड प्लेस, विरोरामा मावथा जवळ पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या लोकांसाठी आम्ही भोजनाची व्यवस्था केली, असं रोशन महानामाने म्हटलं आहे. दिवसेंदिवस ही रांग लांबच होत चालली आहे. रांगेत उभ राहून लोकांची प्रकृती खराब होतेय. रोशन महानामाने पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या लोकांना स्वत:ची काळजी घेण्याचं आवाहन केलं. रोशन महानामाच्या या कृतीच सर्वत्र कौतुक होतय. रोशन महानामा श्रीलंकेसाठी 52 कसोटी आणि 213 वनडे सामने खेळला आहे. टेस्टमध्ये 4 शतक आणि 11 अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. कसोटीत 2 हजार 576 धावा त्याने केल्या. वनडेत 5 शतक आणि 35 अर्धशतकांसह एकूण 5 हजार 162 धावा त्याच्या नावावर आहेत.
We served tea and buns with the team from Community Meal Share this evening for the people at the petrol queues around Ward Place and Wijerama mawatha.
The queues are getting longer by the day and there will be many health risks to people staying in queues. pic.twitter.com/i0sdr2xptI— Roshan Mahanama (@Rosh_Maha) June 18, 2022
रोशन महानामा 1996 सालच्या श्रीलंकेच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग होता. श्रीलंकेने फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. रोशन महानामा श्रीलंकेकडून 1987, 1992, 1996 आणि 1999 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला. 1999 वर्ल्ड कप नंतर रोशन महानामाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर रोशन महानामा आयसीसीचे मॅच रेफरी बनले. 2004 साली वेस्ट इंडिज आणि बांगलादेश दरम्यान झालेल्या वनडे मॅचमध्ये त्यांनी मॅच रेफरी म्हणून डेब्यु केला होता.