दिग्गज माजी क्रिकेटपटूचं निधन, कानपूरशी खास कनेक्शन; क्रिकेटविश्वात शोककळा

| Updated on: Dec 09, 2023 | 12:33 PM

क्रिकेट विश्वातून एक दु:खद बातमी समोर.. दिग्गज माजी क्रिकेटपटूचं निधन, क्रिकेटविश्वात शोककळा... त्यांनी क्रिकेटविश्वात उत्कृष्ट कामगिरी करत रचले अनेक विक्रम... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त क्रिकेटपटूच्या निधनाची चर्चा...

दिग्गज माजी क्रिकेटपटूचं निधन, कानपूरशी खास कनेक्शन;  क्रिकेटविश्वात शोककळा
Follow us on

मुंबई | 9 डिसेंबर 2023 : क्रिकेट विश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. क्रिकेटविश्वात दमदार कामगिरी करणाऱ्या एका दिग्गज क्रिकेटपटूचं निधन झालं आहे. म्हणून क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. सध्या ज्या माजी क्रिकेटपटूच्या निधनाची चर्चा रंगत आहे, ते क्रिकेटपटू दुसरे तिसरे कोणी नसून वेस्ट इंडिजचे माजी फलंदाज जो सॉलोमन आहेत. वयाच्या 93 व्या वर्षी जो सॉलोमन यांनी अखेरचा श्वास घेतला. सोशल मीडियावर देखील जो सॉलोमन यांच्या निधनाची चर्चा रंगली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो सॉलोमन यांचा भारतातील कानपूर शहराशी देखील खास संबंध आहे. याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

जो सॉलोमन यांचा भारतातील कानपूर शहराशी खास संबंध

जो सॉलोमन यांचा भारतातील कानपूर शहराशी खास संबंध आहे. कानपूर आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सॉलोमन यांचा प्रवास… यामध्ये फार खास कनेक्शन आहे. 1958 मध्ये, त्यांची भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिज संघात पहिल्यांदा निवड झाली होती. त्यानंतर जो सॉलोमन यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.

 

 

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सॉलोमन यांनी त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या सामन्यात सॉलोमन यांनी दमदार कामगिरी केली आणि अनेक विक्रम रचले. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर रंगलेला सामना सॉलोमन यांच्यासाठी खास ठरला. सामन्यात सॉलोमन यांनी पहिल्या डावात 45 तर दुसऱ्या डावात 86 धावा केल्या.

सॉलोमन यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे वेस्ट इंडिजचा संघ 203 धावांनी सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर जो सॉलोमन यांनी इतर सामन्यामध्ये देखील दमदार कामगिरी करत क्रिकेटच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

जो सॉलोमन यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

जो सॉलोमन यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 7 वर्षे टिकलं. या सात वर्षांमध्ये जो सोलोमन यांनी वेस्ट इंडिजसाठी 27 कसोटी सामने खेळले होते. या सामन्यांमध्ये जो सॉलोमन यांनी 1 शतक आणि 9 अर्धशतकांसह 1326 धावा केल्या. जो सॉलोमन यांनी क्रिकेटविश्वात उत्कृष्ट कामगिरी केली. एवढंच नाही तर अनेक नवीन क्रिकेटपटूंसाठी जो सॉलोमन प्रेरणास्थानी आहेत.