NZ vs BAN: अरे हे काय? लॉलीपॉप कॅचसाठी चौघे धावले पण एकानेही नाही पकडली, पहा VIDEO

| Updated on: Oct 13, 2022 | 1:31 PM

NZ vs BAN: एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील प्रकार पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल

NZ vs BAN: अरे हे काय? लॉलीपॉप कॅचसाठी चौघे धावले पण एकानेही नाही पकडली, पहा VIDEO
nz vs ban
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई: न्यूझीलंडमध्ये सध्या तिरंगी टी 20 मालिका सुरु आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान (Pakistan) आणि बांग्लादेश (Bangladesh) या तीन टीम्स टुर्नामेंटमध्ये खेळत आहेत. पॉइंटस टेबलमध्ये टॉपवर असणाऱ्या दोन टीम्समध्ये फायनल होईल. ख्राइस्टचर्चमध्ये बुधवारी न्यूझीलंड आणि बांग्लादेशमध्ये (NZ vs BAN) पाचवा सामना झाला. या मॅचमध्ये न्यूझीलंडने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 208/5 धावा केल्या.

न्यूझीलंडकडून कॉनवेने 40 चेंडूत 64 धावा, ग्लेन फिलिप्स 24 चेंडू 60 धावा, गुप्टील 27 चेंडूत 34 धावा आणि फिन एलनने 19 चेंडूत 32 धावा फटकावल्या. यांच्या फलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने 208 धावा केल्या.

दोघांचा डाव सावरण्याचा प्रयत्न

मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना बांग्लादेशने दोन विकेट लवकर गमावल्या. सौम्य सरकार आणि शाकीब अल हसनने अडचणीत सापडलेल्या बांग्लादेशचा डाव सावरण्यााच प्रयत्न केला. पण त्यांना फक्त 43 धावा जोडता आल्या.

त्यानंतर बांग्लादेशचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत राहिले. त्यांनी हा सामना 48 धावांनी गमावला. कॅप्टन शाकीब अल हसनने 44 चेंडूत 70 धावा केल्या. पण या धावा पराभव टाळण्याची पुरेशा नव्हत्या.

बॉल बॅटच्या टॉप एजला लागला

या सामन्यात काही इंटरेस्टिंग क्षण पहायला मिळाले. पण बांग्लादेशच्या इनिंगमध्ये पहिल्याच षटकात एक चक्रावून सोडणारी गोष्ट पहायला मिळाली. नाजमुल शांतोचा एक सोपा झेल सोडला. ट्रेंट बोल्टने पहिल्या ओव्हरचा तिसरा चेंडू गुड लेंग्थवर टाकला. शांतोने क्रीजबाहेर येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण बॉल बॅटच्या टॉप एजला लागला.

खरंतर हा सोपा लॉलीपॉप झेल होता

चेंडू हवेत उंच शॉर्ट कव्हरच्या दिशेने गेला. विकेटकीपर डेवॉन कॉनवेने कॅचसाठी कॉल दिला. पण मध्येच त्याने माघार घेतली. टीम साऊथी, ग्लेन फिलिप्स आणि बोल्ट कॅचसाठी धावले. पण कोणी चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. खरंतर हा सोपा लॉलीपॉप झेल होता. पण कोणीच ही कॅच पकडली नाही.

जे झालं, त्यावर बोल्टला विश्वासच बसला नाही. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. ही मॅच न्यूझीलंडने 48 धावांनी जिंकली. बांग्लादेशच्या टीमने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 160 धावा केल्या.