रोहित शर्मापासून विराट पर्यंत… या स्टार खेळाडूंना हा शेवटचा T20 वर्ल्डकप?

| Updated on: Jun 26, 2024 | 8:18 PM

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 2024 च्या T20 विश्वचषकात भारताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तो मैदानात आला. या सामन्यात तो फक्त 6 रन करु शकला. ऑस्ट्रेलियाचा प्रवास सुपर-8 फेरीत संपलाय.

1 / 6
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा हा शेवटचा T20 विश्वचषक असू शकतो. तो आता 37 वर्षांचा आहे. रोहित टी-20 फॉरमॅटला अलविदा करेल अशी अपेक्षा आहे. त्याने 2007 मध्ये टी-20 मध्ये पदार्पण केले आणि 157 सामन्यांमध्ये 4165 धावा केल्या आहेत.

2 / 6
स्टार फलंदाज विराट कोहलीचा देखील हा शेवटचा टी-20 विश्वचषक असू शकतो. जर भारताने हा वर्ल्डकप जिंकला तर तो देखील T20 आंतरराष्ट्रीयमधून निवृत्त झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. कोहलीने 2010 मध्ये या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. 35 वर्षीय कोहलीने आतापर्यंत 123 सामन्यांमध्ये 4100 हून अधिक धावा केल्या आहेत.

3 / 6
बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनही आता निवृत्ती घेऊ शकतो. 37 वर्षीय शाकिबचा देखील हा शेवटचा टी-20 विश्वचषक असू शकतो. बांगलादेशचा संघ सुपर-8 मधून बाहेर पडलाय.

4 / 6
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल हा 2026 मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकात दिसण्याची शक्यता कमी आहे. वेस्ट इंडिजचा सुपर-8 फेरीतच पराभव झाला. वनडेप्रमाणेच रसेल टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून देखील निवृत्ती घेऊ शकतो.

5 / 6
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आणि अष्टपैलू इमाद वसीम हे देखील टी-20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात.

6 / 6
न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने देखील पुष्टी केली आहे की तो यापुढे टी -20 विश्वचषक खेळणार नाही. न्यूझीलंडचा संघ साखळी फेरीतून बाहेर पडला होता.