गौतम गंभीरने अखेर टीम इंडियाच्या ‘त्या’ दोन स्टार खेळाडूंवर काढला मनातला राग

| Updated on: Sep 19, 2022 | 1:42 PM

त्या दोघांच नाव घेणं आधी बंद करा, गौतग गंभीरचा 'त्या' दोन स्टार खेळाडूंवर इतका राग का?

गौतम गंभीरने अखेर टीम इंडियाच्या त्या दोन स्टार खेळाडूंवर काढला मनातला राग
Gautam-Gambhir
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई: टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर क्रिकेट संदर्भातील विषयांवर बेधडक, बिनधास्त मत व्यक्त करतो. गौतम गंभीरने मांडलेला विचार अनेकदा बातमीचा विषय बनतो. गौतम गंभीरने आता सुद्धा अशीच बेधडक मत मांडली आहेत. त्याने क्रिकेटमधील हिरो कल्चरवर बोट ठेवलं आहे. कुठल्या एका क्रिकेटरची पूजा करणं बंद करा, असं त्याने म्हटलं आहे.

मीडियाला दिला सल्ला

गौतम गंभीरने थेट मोठ्या खेळाडूंची नाव घेतली आहेत. आपण कपिल देव, विराट कोहली, एमएस धोनी यांची नाव सोडून फक्त टीमबद्दल बोललं पाहिजे. त्याने मीडियाला सुद्धा सल्ला दिला. मीडियाने फक्त एका खेळाडूवर नाही, तर टीमच्या अन्य खेळाडूंवर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे.

गौतमच्या गंभीर गोष्टी

आपण कुठल्या एका खेळाडूला मोठं करण्याऐवजी पूर्ण टीम कशी मोठी होईल? त्यावर लक्ष दिलं पाहिजे, असा सल्ला गंभीरने दिला. ज्या दिवशी विराट कोहलीने 71 वी सेंच्युरी मारली, त्याचदिवशी भुवनेश्वर कुमारने 5 विकेट घेतल्या होत्या. पण सगळे विराटबद्दलच बोलत होते.

मी एकाट होतो, जो त्या दिवशी….

“ज्या दिवशी विराटने सेंच्युरी मारली, त्याचदिवशी मेरठ सारख्या छोट्याशा खेड्यातून आलेल्या भुवनेश्वर पाच विकेट घेतल्या. पण कोणी त्याबद्दल बोललं नाही. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. कॉमेंट्री करताना मी सातत्याने भुवनेश्वरबद्दल बोलत होतो. भुवनेश्वरने 4 ओव्हरमध्ये 5 विकेट घेतल्या होत्या. याबद्दल फार लोकांना माहित असेल, असं मला वाटत नाही” असं गंभीर म्हणाला.

‘या’ संस्कृतीमधून बाहेर पडाव लागेल

गौतम गंभीर इंडियन एक्स्प्रेसच्या कार्यक्रमात बोलत होता. विराटच्या शतकाचा संपूर्ण देशात जल्लोष सुरु होता. “भारताला एका हिरोच्या संस्कृतीमधून बाहेर पडावं लागेल. क्रिकेट असो किंवा राजकारण, आपण फक्त भारतीय क्रिकेटबद्दल बोललं पाहिजे” असं गौतम म्हणाला.