Virat Kohli | न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यानंतर विराट कोहलीबद्दल त्याचा कट्टर विरोधक म्हणाला….

| Updated on: Oct 23, 2023 | 10:48 AM

IND vs NZ | त्याने एमएस धोनीचा सुद्धा यामध्ये उल्लेख केला. सध्या देशात विराट कोहलीची चर्चा आहे. चहूबाजूंनी विराटवर कौतुकाचा वर्षाव होतोय. विराट या कौतुकासाठी पात्र सुद्धा आहे. आता विराट कोहलीबद्दल त्याच्या कट्टर विरोधकाने आपल मत नोंदवलय.

Virat Kohli | न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यानंतर विराट कोहलीबद्दल त्याचा कट्टर विरोधक म्हणाला....
नेहमीप्रमाणे भारतीय संघ आपल्या परफॉर्मन्सने सगळ्यांना खुश करतोय. वर्ल्ड कपमध्ये पहिले चार सामने जिंकून भारताची धुमधडाक्यात सुरुवात झालीये.
Follow us on

धर्मशाळा : सध्या सर्वत्र विराट कोहलीची चर्चा आहे. विराटची चर्चा होण सुद्धा स्वाभाविक आहे. कारण त्याचा परफॉर्मन्सच तसा आहे. वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये विराट कोहली धावांच्या राशी उभारतोय. काल सचिन तेंडुलकरच्या वनडेमधील सर्वाधिक शतकांशी बरोबरी करण्याची संधी थोडक्यात हुकली. सचिनच्या नावावर वनडेमध्ये 49 सेंच्युरी आहेत. विराट कोहलीला शतकासाठी फक्त 5 धावा कमी पडल्या. अन्यथा त्याने कालच सचिनच्या वनडेमधील शतकांशी बरोबरी केली असती. विराट कोहली 95 धावांवर आऊट झाला. त्याआधी बांग्लादेश विरुद्ध त्याने नाबाद 103 धावा फटकावल्या होत्या. विराट कोहलीवर सध्या चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होतोय. विराट या कौतुकासाठी पात्र सुद्धा आहे. कारण प्रत्येक सामन्यात तो त्याच्या खेळाने टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचतोय. वनडाऊन आल्यानंतर विराट शेवटपर्यंत खेळपट्टीवर उभा राहतोय. हे त्याच्या इनिंगच वैशिष्टय आहे.

चालू वर्ल्ड कपध्ये एकदा नाही, दोनदा विराट कोहलीने टीम इंडियासाठी फिनिशरची भूमिका बजावली. क्रिकेट एक्सपर्ट ते फॅन्स सगळेच त्याच कौतुक करतायत. अगदी गौतम गंभीरने सुद्धा विराटच कौतुक केलय. एमएस धोनीपेक्षा विराट कोहली उत्तम फिनिशर असल्याच गंभीरने म्हटलय. गौतम गंभीर हा विराट कोहलीचा कडवा टीकाकार म्हणून ओळखला जातो. दोघांमधील मतभेद सर्वश्रुत आहेत. आयपीएल 2023 मध्ये दोघांमध्ये मैदानावर चांगलच वाजलं होतं. आता त्याच गौतम गंभीरने विराट कोहलीच कौतुक केलय.

तो आधीच आऊट झाला, पण….

“विराट कोहली इतका दुसरा चांगला फिनिशर नाहीय. 5 व्या आणि 7 व्या नंबरवर येणारच फिनिशर नसतो, विराट चेस मास्टर आहे” असं गौतम गंभीर म्हणाला. रविवारी न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने परफेक्ट बॅटिंग केली. आक्रमकतेबरोबर संयमाने सावध फलंदाजी केली. त्याने केएल राहुल आणि रविंद्र जाडेजा यांच्याबरोबर दोन महत्त्वाच्या भागीदाऱ्या केल्या. त्यामुळे टीम इंडियाने न्यूझीलंडवर 5 विकेट राखून विजय मिळवला. 274 धावांचा पाठलाग करताना कोहली शेवटपर्यंत टिकला नाही. विजयासाठी 5 धावांची गरज असताना तो बाद झाला. पण तो, पर्यंत त्याने टीमला आरामात विजय मिळेल, अशा स्थितीत आणून ठेवलं होतं.