टीम इंडियाचा कोच झालेल्या गौतम गंभीरकडे आहे इतक्या कोटींची संपत्ती

| Updated on: Jul 10, 2024 | 2:51 PM

Gautam Gambhir : भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरची बीसीसीआयने नवीन हेड कोच म्हणून नियुक्ती केली आहे. गौतम गंभीरला टीम इंडियाचा हेड कोच बनल्यानंतर किती पगार मिळणार असा अनेकांना प्रश्न पडला आहे. गौतम गंभीरची लाईफस्टाईल कशी आहे. गंभीर बद्दल सर्वकाही जाणून घ्या.

टीम इंडियाचा कोच झालेल्या गौतम गंभीरकडे आहे इतक्या कोटींची संपत्ती
Follow us on

भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या प्रशिक्षकाची मंगळवारी घोषणा करण्यात आली. राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर आता त्याची जागा माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर घेणार आहे. तो संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. गौतम गंभीर हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर आहे. त्याच्या प्रशिक्षणाखालीच आयपीएल-2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स चॅम्पियन बनली. गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच बनल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडलाय की, टीम इंडियाचा कोच बनल्यानंतर गौतम गंभीरला किती पगार मिळणार आहे.

गौतम गंभीरकडे किती संपत्ती?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतम गंभीर हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूं पैकी एक आहे. 2019 मध्ये गौतम गंभीरने लोकसभा निवडणूक लढवली होती. तो खासदार म्हणून देखील निवडून आला होता. तेव्हा निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीत सांगितले होते की त्यांच्याकडे एकूण 147 कोटी रुपयांची संपत्ती आहे. दरवर्षी तो 12.5 कोटी रुपये कमावतो. एका रिपोर्टनुसार, गौतम गंभीरची सध्याची संपत्ती 250 कोटी रुपये आहे.

उत्पन्नाच स्रोत काय?

गौतम गंभीर हा 2019 ते 2024 पर्यंत लोकसभेचा खासदार होता. आता तो माजी खासदार असल्याने भारत सरकारकडून त्याला वार्षिक 3-3.50 लाख रुपये पेन्शन म्हणून मिळते. याशिवाय माजी खासदार म्हणून वेगवेगळे भत्तेही मिळतात. ज्यामध्ये प्रवास, टेलिफोन यासारख्या गोष्टींचाही समावेश आहे. याशिवाय गौतम गंभीर सामन्यांमध्ये समालोचन करुन देखील कमाई करतो. प्रत्येक सामन्यासाठी त्याला 1.50 कोटी रुपये घेतो. गौतम गंभीर 2018 पर्यंत आयपीएल खेळला. ज्यातून त्याने करोडो रुपये कमावले. IPL-2024 मध्ये गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सकडून मेंटर म्हणून करोडो रुपये फी घेतली होती. गौतम गंभीरने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. रेस्टॉरंट आणि रिअल इस्टेट कंपन्यांचाही यात समावेश आहे. यातून गौतम गंभीर दरवर्षी 7-8 कोटी रुपये कमावतो.

घराची किंमत किती

गौतम गंभीर दिल्लीच्या राजेंद्र नगरमध्ये राहतो. त्याच्या घराची किंमत 15 कोटी रुपये आहे. त्याने घराच्या इंटिरिअरवर देखील खूप पैसा खर्च केलाय. गौतम गंभीरचा नोएडा येथील जेपी विश टाऊनमध्ये प्लॉट देखील आहे. ज्याची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे. गौतम गंभीरच्या गावातील घराची किंमत एक कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे?

गौतम गंभीरचे वडील दीपक गंभीर यांचा कापडाचा व्यवसाय आहे. गंभीरची पत्नी नताशा जैनही एका व्यावसायिक कुटुंबातून येते.

लक्झरी कार आणि महागड्या घड्याळांचा शौक

भारतीय संघाचा नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडे मर्सिडीज, ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या आलिशान कार आहेत. गंभीर बहुतेक मर्सिडीजमधूनच प्रवास करताना दिसतो. या कारची किंमत 1.50 ते 3 कोटी रुपयांपर्यंत आहे. याशिवाय गौतम गंभीरकडे ऑडीची क्यू-5, टोयोटा कोरोला आणि महिंद्रा बोलेरोची स्टिंगर सारख्या कार आहेत गौतम गंभीरला महागडी घड्याळे घालण्याचाही खूप शौक आहे. गंभीरने Panerai Luminor Marina घड्याळ घातले आहे, ज्याची किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे. याशिवाय गौतम गंभीरकडे लाखो रुपयांच्या घड्याळांचा संग्रह आहे.

प्रशिक्षक म्हणून किती पगार मिळेल?

टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरला 12 ते 15 कोटी रुपये वार्षिक पगार मिळणार आहे. याआधी टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड होते, ज्यांना बीसीसीआय वार्षिक 12 कोटी रुपये मानधन देत असे. बीसीसीआय राहुल द्रविडपेक्षा गौतम गंभीरला जास्त पगार देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.