नवी दिल्ली : भारताच्या एका माजी क्रिकेटपटूची लखनऊ सुपर जायंट्स टीममध्ये एंट्री झाली आहे. गौतम गंभीरच्या टीममध्ये त्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. या खेळाडूची एंट्री हा गौतम गंभीर यांच्यासाठी सूचक इशारा मानला जातोय. कदाचित गौतम गंभीर लवकरच लखनऊ सुपर जायंट्समधून आपल्याला बाहेर पडलेले दिसू शकतात. कारण तशा हालचाली सुरु झाल्याच वृत्त आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू एमएसके प्रसाद यांची लखनऊ सुपर जायंट्स टीममध्ये एंट्री झाली आहे.
एमएसके प्रसाद टीम इंडियाचे माजी सिलेक्टरही आहेत. त्यांना LSG मध्ये स्ट्रॅटेजिक कंसल्टेंटचा रोल दिला आहे. गुरुवारी फ्रेंचायजीने ही घोषणा केली. एमएसके प्रसाद टॅलेंट सर्च आणि टॅलेंट डेव्हलपमेंट हेड म्हणून फ्रेंचायजीला मदत करतील. अलीकडेच LSG ने जस्टिन लँगर यांची हेड कोच पदी नियुक्ती केली आहे.
LSG ने हेड कोचही बदलला
इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढच्या 2024 च्या सीजनमध्ये गौतम गंभीर LSG टीमसोबत दिसणार नाहीत. ते एलएसजीमधून बाहेर पडण्यासाठी तयार आहेत. लखनऊ सुपर जायंट्स पुन्हा एकदा नव्याने टीमची फेररचना करत आहे. यात अँडी फ्लॉवर यांच्याजागी जस्टिन लँगर यांची हेड कोचपदी नियुक्ती केली आहे.
Former India cricketer MSK Prasad joins the Super Giants as our Strategic Consultant! 🤝
Full story 👉 https://t.co/kwtmp8awBE pic.twitter.com/gW9kiQJePM
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) August 17, 2023
गौतम गंभीर स्वगृही परतणार ?
आता गौतम गंभीर LSG पासून वेगळे होऊ शकतात. “अँडी फ्लॉवर आणि गौतम गंभीर LSG मधून बाहेर पडतील. यापेक्षा मी जास्त काही सांगू शकत नाही” असं दैनिक जागरणने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे. गौतम गंभीर स्वगृही परतू शकतात अशी सुद्धा चर्चा आहे. गौतम गंभीर यांनी कोलकता नाइट रायडर्सच नेतृत्व केलय. त्यांच्या कॅप्टनशिपखाली टीमने विजेतेपद मिळवलय. गौतम गंभीर केकेआर टीमच्या मेंटॉरच्या रोलमध्ये दिसू शकतात.
2001 दरम्यान 6 टेस्ट आणि 17 वनडे सामने
एमएसके प्रसाद यांच्या अनुभवाचा फायदा होईल असं लखनऊ सुपर जायंट्सने म्हटलं आहे. एमएसके प्रसाद यांनी आंध्र क्रिकेट असोशिएशनच्या डायरेक्टर ऑफ ऑपरेशनपद भूषवलं आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय करिअरबद्दल बोलायच झाल्यास, ते 1999 ते 2001 दरम्यान 6 टेस्ट आणि 17 वनडे सामने खेळले आहेत. त्यांच्याकडे 96 फर्स्ट क्लास सामन्यांचा अनुभव आहे.