IPL 2024 : आयपीएल 2024 पूर्वी आणखी एक मोठा बदल झाला आहे. गौतम गंभीरने 6 वर्षांनंतर पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाच्या कॅम्पमध्ये परतला आहे. गौतम गंभीर याआधी लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) संघाशी जुडलेला होता. गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला IPL 2012 आणि IPL 2014 चे विजेतेपद मिळवून दिले होते. गौतम गंभीर IPL 2022 आणि IPL 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघात मार्गदर्शकाच्या भूमिकेत होता.
गौतम गंभीरने 2011 ते 2017 पर्यंत कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) नेतृत्व केले. 2017 नंतर, गौतम गंभीर आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) वेगळे झाले. परंतु आता गौतम गंभीर 6 वर्षांनंतर पुन्हा एकदा कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघात परतला आहे. गौतम गंभीरला आयपीएल 2024 सीझनसाठी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचा मार्गदर्शक बनवण्यात आला आहे.
गौतम गंभीरने बुधवारी सोशल मीडियावर (X) एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने कोलकाता नाइट रायडर्सचा मार्गदर्शक बनल्याची माहिती शेअर केली. गौतम गंभीरने लिहिले की, ‘लखनऊ सुपर जायंट्ससोबतचा माझा प्रवास आता संपला आहे. लखनऊ सुपर जायंट्समधील माझ्या कामाच्या दरम्यान, मला खेळाडू, प्रशिक्षक आणि संघाशी संबंधित प्रत्येक सदस्याकडून पाठिंबा मिळाला. मी लखनौ सुपर जायंट्स संघाचे मालक डॉ. संजीव गोयंका यांचे आभार मानू इच्छितो. डॉ.संजीव गोयंका यांचे नेतृत्व उत्कृष्ट राहिले आहे. मला आशा आहे की लखनौ सुपर जायंट्स संघ भविष्यातही आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवेल. ऑल द बेस्ट टीम…’
❤️❤️ LSG Brigade! pic.twitter.com/xfG3YBu6l4
— Gautam Gambhir (@GautamGambhir) November 22, 2023
गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघात प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यासोबत मार्गदर्शक म्हणून काम करेल. लखनौ सुपर जायंट्स संघाचे पहिले मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी संघ सोडला होता. आता मार्गदर्शक गौतम गंभीरनेही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.