मुंबई: ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup) सुरु झाला आहे. एकाबाजूला ग्रुप राऊंडचे सामने सुरु आहेत. दुसऱ्याबाजूला सुपर 12 मध्ये थेट प्रवेश करणाऱ्या टीम्स वॉर्म अप मॅचेस (Warmup Matches) खेळत आहेत. टीम इंडियाने सोमवारी ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) विरुद्ध पहिला सराव सामना खेळला. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा एक स्टार खेळाडू थोडक्यात गंभीर जखमी होण्यापासून बचावला.
ग्लेन मॅक्सवेल थोडक्यात बचावला
भारताने पहिली बॅटिंग करताना 186 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियन फलंदाज मैदानात उतरले. युजवेंद्र चहल 12 वी ओव्हर टाकत होता. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर मॅक्सवेलने पुल मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करुन बॅटच्याकडेला लागला. या बॉलवर धाव काढली. पण मॅक्सवेलचा डोळा थोडक्यात बचावला. हा बॉल डोळ्याला लागला असता, तर मॅक्सवेल गंभीर जखमी झाला असता.
भारतीय खेळाडूंकडून मॅक्सवेलची विचारपूस
या चेंडूनंतर फिंचने येऊन मॅक्सवेलची चौकशी केली. मॅक्सवेलने त्याला आपला डोळा दाखवला. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि युजवेंद्र चहलने मॅक्सवेलला दुखापत तर झाली नाही ना? याची विचारपूस केली.
Glenn Maxwell’s attempted switch hit which hits him near his eyes. #T20WorldCup2022 pic.twitter.com/sYRy5nYlre
— Ranjeet – Wear Mask? (@ranjeetsaini7) October 17, 2022
भारताने जिंकला सामना
केएल राहुल 33 चेंडूत 57 धावा आणि सूर्यकुमार यादव 33 चेंडू 50 रन्स यांच्या बळावर भारताने 186 धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाला 12 चेंडूत 16 धावांची आवश्यकता होती. त्यांचे सहा विकेट्स बाकी होते. त्यानंतर शमी, हर्षल पटेल आणि विराट कोहलीने मॅचचा नूरच पालटून टाकला.