भारतीय क्रिकेटमध्ये (Indian Cricket Team) सध्या मोठे बदल होत आहेत. मुख्य कोचपासून कर्णधारापर्यंत बदल झाले आहेत. पुढच्या काही दिवसात आणखी काही बदल पाहायला मिळू शकतात.
कसोटी संघासाठी नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा अजून व्हायची आहे. संघातील काही सिनियर खेळाडूंच स्थानही धोक्यात आलं आहे.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांना श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघातून डच्चू मिळू शकतो. हे दोघे सध्या खराब फॉर्ममध्ये आहेत.
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या तिन्ही कसोटी सामन्यात त्यांना भरपूर संधी मिळाल्या. पण त्यांना मिळालेल्या संधीचा फायदा उचलता आला नाही.
त्यांना संघातून वगळण्याची मागणी होत आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सुद्धा तसेच संकेत दिले आहेत. त्यामुळे दोघांना संघातून डच्चू मिळणार हे जवळपास निश्चित आहे.
मागच्या दहा वर्षांपासून मधल्याफळीत खेळणारे चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली मागच्या दोन वर्षांपासून खराब फॉर्ममध्ये आहेत.
विराट कोहलीची क्षमता लक्षात घेता त्याचं स्थान धोक्यात नाहीय. पण पुजारा आणि रहाणेचं स्थान निश्चित धोक्यात आहे.
स्पोर्टस्टार मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुलीने अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराबद्दल काही खास संकेत दिले आहेत.
"दोघेही चांगले खेळाडू आहे. रणजी करंडक स्पर्धेत खेळून दोघे खोऱ्याने धावा करतील, अशी अपेक्षा आहे. रणजीमध्ये दोघे चांगल्या धावा करतील, यामध्ये मला काही शंका वाटत नाही. रणजी करंडक महत्त्वाची स्पर्धा असून आपण सर्व यामध्ये खेळलो आहोत. त्यामुळे ते दोघे रणजीमध्ये खेळतील व तिथे चांगली कामगिरी करतील"
श्रेयस अय्यर, हनुमा विहारी आणि सुर्यकुमार यादवसारखे टॅलेंटड खेळाडू कधीपासून संधीच्या प्रतिक्षेत आहेत.