वॉशिंग्टन: टीम इंडियाने काल पाकिस्तानवर रोमांचक विजय मिळवला. अक्षरक्ष: हरलेला सामना विराट कोहलीने खेचून आणला. शेवटच्या चेंडूवर टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये विजय मिळवला. खऱ्याअर्थाने जगभरातील तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांना क्रिकेटचा थरार अनुभवता आला. या विजयाचे सोशल मीडियावरही पडसाद उमटत आहेत. सर्वच स्तरातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
‘ते’ टि्वट पाकिस्तानी चाहत्याला पचलं नाही
अगदी गुगल कंपनीचे सीईओ सुद्धा याला अपवाद नाहीत. सुंदर पिचाई यांना क्रिकेटची आवड आहे. सुंदर पिचाई यांनी, आज जगभरातील भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना टीम इंडियाच कौतुक केलं. पिचाई यांनी केलेलं हे टि्वट पाकिस्तानी चाहत्याला पचवता आलं नाही. त्याने सुंदर पिचाई यांना रिप्लाय केला. त्यावर सुंदर पिचाई यांनी दिलेल्या उत्तराने त्या पाकिस्तानी चाहत्याची बोलती बंद झाली.
you should watch 1st three overs
— Muhammad Shahzaib (@Muhamma91436212) October 24, 2022
सुंदर पिचाई टि्वटमध्ये काय म्हणाले?
सर्वांना हॅप्पी दिवाळी ! तुम्ही सर्व तुमचे कुटुंबीय आणि मित्र परिवारासोबत दिवाळी आनंदात साजरी करत असाल. आज पुन्हा एकदा मी शेवटची तीन षटक पाहून दिवाळी साजरी केली. टीम इंडियाने काय कामगिरी केली, अप्रतिम असं सुंदर पिचाई यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटलं होतं.
Did that too:) what a spell from Bhuvi and Arshdeep
— Sundar Pichai (@sundarpichai) October 24, 2022
ट्रोलिंगचा प्रयत्न
त्यावर पाकिस्तानच्या समर्थकाने सुंदर पिचाई यांनी सुरुवीच्या तीन ओव्हर बघायला पाहिजे होत्या, असा रिप्लाय दिला. भारताच्या डावात पहिल्या तीन ओव्हर्समध्ये टीम इंडियाने झटपट विकेट गमावल्या होत्या. त्याने सुंदर पिचाई यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
भारतीय चाहत्यांकडून पाकिस्तानची फिरकी
त्यावर सुंदर पिचाई यांनी त्या पाकिस्तानी चाहत्याला ‘हो बघितल्या, भुवी आणि अर्शदीपने काय स्पेल टाकला’ असं भन्नाट उत्तर दिलं. सुंदर पिचाई यांचे हे टि्वट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट करण्यात येत असून भारतीय चाहते पाकिस्तानची फिरकी घेत आहे.
Kaafi sundar reply ❣️? pic.twitter.com/IlxfIgZYSH
— Professor ngl राजा बाबू ?? (@GaurangBhardwa1) October 24, 2022
पाकिस्तानने काल पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 159 धावा केल्या. टीम इंडियाने 20 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर विजयी लक्ष्य गाठलं. विराट कोहली टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने नाबाद 82 धावा फटकावल्या. दुसऱ्याबाजूने हार्दिक पंड्याने 37 धावा काढून त्याला साथ दिली.