Birthday Special: भारताविरुद्ध पदार्पण, प्रत्येक कसोटीत सरासरी 3 विकेट्स, झाडावरुन पडला आणि मारला लकवा

| Updated on: Sep 18, 2021 | 10:59 AM

या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना आधी एकदिवसीय सामन्यात आणि नंतर कसोटी सामन्यात दोन्ही वेळा भारताविरुद्धच पहिला सामना खेळला होता.

Birthday Special: भारताविरुद्ध पदार्पण, प्रत्येक कसोटीत सरासरी 3 विकेट्स, झाडावरुन पडला आणि मारला लकवा
विन्स्टन डेविस
Follow us on

मुंबई: वेस्ट इंडीजने (West Indies) 70 ते 80 च्या दशकात क्रिकेट जगताला अनेक अद्भुत असे वेगवान गोलंदाज दिले. त्यांची गोलंदाजी पाहून फलंदाजालाच नाही तर प्रेक्षकांनाही घाम फुटायचा. अशाच घातक गोलंदाजांपैकी एक म्हणजे विन्स्टन डेविस (Winston Davis). आता तुम्ही विचार कराल आज अचानक या खेळाडूबद्दल आम्ही का सांगतोय? तर याचं कारण हे आहे की, या डेविस यांचा आज 63वा वाढदिवस आहे. 18 सप्टेंबर, 1958 रोजी जन्मलेल्या विन्स्टन यांनी 1981 ते 82 च्या दरम्यान त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या विरोधात 5 विकेट्स घेतले होते. तेव्हा पहिल्यांदा ते चर्चेत आले होते. त्यानंतर वर्षभरात त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मार्च, 1983  मध्ये भारताविरुद्ध पहिला वनडे आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर त्यांनी पहिली टेस्ट मॅचही भारताविरुद्धच खेळली.

विन्स्टन डेविस यांनी 1983 ते 1988 च्या दरम्यान 15 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 45 विकेट्स घेतले. ज्यामुळे सरासरीने विचार करता एका कसोटी सामन्यात त्यांनी 3 विकेट्स घेतले. विन्स्टन यांनी त्यांच्या कारकिर्दीत 35 वनडे सामन्यात 39 विकेट पटकावले. त्यांच सर्वोत्कृष्ट प्रदर्शन हे 1983 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाहायला मिळालं. हेडिंग्लेमध्ये खेळण्यात आलेल्या दुसऱ्या ग्रुप मॅचमध्ये त्यांनी 51 धावा देत तब्बल 7 गड्यांना तंबूत धाडलं होतं. पुढील 20 वर्ष हा रेकॉर्ड कोणालाच तोडता आला नव्हता. विन्स्टन यांनी पहिली विकेट ही भारतीय खेळाडू मोहिंदर अमरनाथ यांची घेतली होती.

1997 मध्ये झाडावरुन पडले आणि लकवा मारला

विन्स्टन डेविस हे 1997 साली एका अपघाताचा शिकार झाले. ते एका झाडावरुन पडले आणि त्यांना स्पायनल इंजरी झाली. ज्यामुळे त्यांना लकवा मारला. वेस्ट इंडीजमध्ये उपचार न झाल्याने विन्स्टन यांनी इंग्लंडमध्ये उपचार घेण्यास सुरुवात केली. याचदरम्यान विन्स्टन डेविस यांनी ‘बिकॉज ऑफ यू’ या फिल्ममध्येही काम केलं. डेविस यांनी 181 प्रथम श्रेणी सामन्यात 608 विकेट घेतले. यामध्ये 7 वेळा त्यांनी 10 विकेट आणि 28 वेळा 5 विकेट घेतले आहेत. त्यांनी प्रथम श्रेणी सामन्यात 2 हजाराहून अधिक धावाही केल्या आहेत.

हे ही वाचा :

‘या’ युवा खेळाडूकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते, सुनील गावस्करांची भविष्यवाणी खरी ठरणार?

पाकिस्तान क्रिकेटवर आणखी एक नामुष्की, आधी मालिका रद्द, मग चूकीचं इंग्रजी लिहीत लाज आणली

IPL 2021 मध्ये आणखी एक धडाकेबाज फलंदाज, 18 चेंडूत 88 धावा करणारा ‘हा’ महारथी खेळणार कोणत्या संघातून?

(Great Bowler and west indies player winston davis is born on this day in cricket)