मुंबई: सध्या ऋषभ पंत मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल आहे. मागच्यावर्षी 30 डिसेंबरला दिल्लीहून रुडकी येथे जात असताना ऋषभच्या कारला भीषण अपघात झाला. सुदैवाने ऋषभ या अपघातातून बचावला. पण त्याला बराच मार लागला. आधी ऋषभवर डेहराडूनच्या रुग्णालायत उपचार झाले. त्यानंतर अधिक चांगल्या उपचारांसाठी मुंबईला शिफ्ट करण्यात आलं. सध्या ऋषभ मुंबईच्या किकोलाबेन रुग्णालयात आहे. नुकतीच त्याच्यावर एक शस्त्रक्रिया झाली. सध्याचा काळ ऋषभसाठी कठीण आहे. या खडतर वेळेत भारतीय क्रिकेट बोर्ड ऋषभच्या पाठिशी भक्कमपणे उभं आहे.
ऋषभ पंतला BCCI कडून किती कोटी मिळणार?
BCCI फक्त ऋषभच्या वैद्यकीय गरजांचीच काळजी घेत नाहीय, तर त्याच व्यावसायिक हितही लक्षात घेऊन मदत करतय. ऋषभ पंत यावर्षी आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. तो पर्यंत, ऋषभ फिट होईल अशी अपेक्षा नाहीय. ऋषभ दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन आहे. त्याला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी 16 कोटी रुपये मिळणार होते. ही रक्कम आता बोर्डाकडून ऋषभला देण्यात येईल. त्याशिवाय बोर्ड सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील 5 कोटी रुपये देईल. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय. पुढचे 6 महिने, तरी ऋषभ मैदानावर दिसणार नाहीय.
नियम काय आहे?
हे लक्षात घेण्यासारखं आहे की, सेंट्रल काँट्रॅक्ट असलेल्या खेळाडूंचा विमा उतरवला जातो. बीसीसीआयच्या नियमांनुसार, या खेळाडूंना दुखापतींमुळे आयपीएलमधून बाहेर पडावं लागल्यास बोर्डाकडून त्यांना पूर्ण मोबदला दिला जातो. संबंधित फ्रँचाइझी नाही तर विमा कंपनी त्यांचा संपूर्ण बिल देते.
ऑपरेशन यशस्वी
ऋषभ पंतच्या गुडघ्यावर शुक्रवारी संध्याकाळी सर्जरी झाली. ऋषभच्या लिगामेंटला मार लागलाय. पंतच्या गुडघ्यावर तब्बल 3 तास ऑपरेशन सुरु होतं. ऋषभ पंतच्या गुडघ्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडलेली आहे.
फक्त आयपीएलच नाही, तर…
ऋषभ पंत फक्त आयपीएल 2023 ला च मुकणार नाहीय, तर सप्टेंबरमध्ये होणारा आशिया कप आणि ऑक्टो-नोव्हेंबरमधील आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये सुद्धा कदाचित खेळू शकणार नाही.