GT Vs CSK Preview IPL 2022: उद्या मोठी मॅच, खरी लढाई रवींद्र जाडेजा विरुद्ध हार्दिक पंड्यामध्ये

| Updated on: Apr 16, 2022 | 3:37 PM

GT Vs CSK Preview IPL 2022: उद्या रविवारी दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) या दोन संघांमध्ये होणार आहे. आयपीएलमध्ये प्रथमच हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत.

GT Vs CSK Preview IPL 2022: उद्या मोठी मॅच, खरी लढाई रवींद्र जाडेजा विरुद्ध हार्दिक पंड्यामध्ये
आर्यलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, हार्दिक पांड्या कॅप्टन, पंतला आराम
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई: उद्या रविवारी दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) या दोन संघांमध्ये होणार आहे. आयपीएलमध्ये प्रथमच हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. गुजरात टायटन्सचा आयपीएलचा (IPL) हा पहिलाच सीजन आहे. चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमधला एक यशस्वी संघ आहे. चारवेळा त्यांनी आयपीएलचं विजेतेपद मिळवलं आहे. ते गतविजेतेही आहेत. उद्या होणाऱ्या सामन्याआधी दोन्ही संघांचा फॉर्म लक्षात घेतला, तर गुजरात टायटन्सच पारडं थोड जड वाटतय. गुजरात टायन्सचा खेळ पाहून त्यांनी आयपीएलमध्ये डेब्यू केलाय, असं अजिबात वाटत नाही. पाच पैकी चार सामने जिंकून पॉइंटस टेबलमध्ये ते अव्वल स्थानावर आहेत. तेच CSK चा स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून संघर्ष सुरु आहे. आतापर्यंत खेळल्या पाच सामन्यांपैकी त्यांनी एकमेव विजय मिळवला आहे. सलग चार परभवांना हा संघ सामोरा गेला.

कोण सरस? गुजरात कि चेन्नई

गुजरातचा संघ फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात संतुलित आहे. गुजरात आणि चेन्नईची मॅच एकप्रकारे दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्समधील सामना असणार आहे. गुजरातचे नेतृत्व करणारा हार्दिक आणि चेन्नईचा रवींद्र जाडेजा दोघे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. भारताच्या अनेक विजयांमध्ये दोघांनी आपल्या ऑलराऊंडर खेळाने योगदान दिलं आहे. दोन्ही टीम्सने आपले मागचे सामने जिंकले आहेत. तीच विजयी लय कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

गुजरातचा संघ हरला पण नंतर कमबॅक

एमएस धोनीने चेन्नईची कॅप्टनशिप सोडताना रवींद्र जाडेजाची नियुक्ती केली. त्याचवेळी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला रिटेन केलं नाही. तेव्हा तो फिटनेसच्या समस्येचा सामना करत होता. त्याच हार्दिकला गुजरात टायटन्सने आपलं कॅप्टन बनवलं. गुजरात टायटन्सचा फक्त सनरायजर्स हैदराबादने 37 धावांनी पराभव केला. त्यानंतर त्यांनी राजस्थान रॉयल्स विरुद्धचा सामना जिंकून पुन्हा कमबॅक केलं. या विजयामध्ये कॅप्टन हार्दिक पंड्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. जाडेजाच्या नेतृत्वाखाली CSK ने पहिले चार सामने गमावले. अखेर 23 धावांनी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर पहिला विजय मिळवला. गोलंदाजी हा चेन्नईचा मुख्य चिंतेचा विषय आहे.