Marathi News Sports Cricket news GT VS DC Result IPL 2022 Lockie Ferguson & Shubman Gill two played important role in gujarat titans win
GT VS DC Result IPL 2022: गुजरात टायटन्सच्या विजयाचे दोन हिरो, पाच कारणं
GT VS DC Result IPL 2022: ऑलराऊंडर हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने (Guajarat Titans) आयपीएल 2022 स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे.
लॉकी फर्ग्युसन
Image Credit source: twitter
Follow us on
पुणे: ऑलराऊंडर हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने (Guajarat Titans) आयपीएल 2022 स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. आज दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने ऑलराऊंडर खेळाचं प्रदर्शन केलं. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi capitals) 14 धावांनी पराभव केला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 171 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 157 धावा केल्या. याआधी गुजरातने मागच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं होतं. तो विजय संघर्षपूर्ण होता. कारण शेवटपर्यंत विजयासाठी झुंजाव लागलं होतं. पण आजचा विजय थोडा सहज होता. सामना रंगतदार होणार असं वाटत असतानाच विकेट गेल्या. याच श्रेय नक्कीच गुजरातच्या गोलंदाजांना द्याव लागेल.
दिल्लीच्या विजयात शुभमन गिल आणि लॉकी फर्ग्युसनने महत्त्वाचं योगदान दिलं. या दोघांनी दिल्लीच्या दुसऱ्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
शुभमन गिलने आज क्लासिक बॅटिंग दाखवली. त्याने 46 चेंडूत 84 धावा फटकावल्या. दिल्लीच्या गोलंदाजांवर त्याने हल्लाबोल केला. हाणामारीच्या षटकात धावांची गती वाढवताना खलील अहमदने त्याचा विकेट काढला. त्याच्या फलंदाजीमुळे गुजरातचा संघ 171 पर्यंत पोहोचला.
लॉकी फर्ग्युसनने गोलंदाजीत कमाल दाखवली. त्याने चार षटकात 28 धावा देताना चार विकेट काढल्या. लॉकी फर्ग्युसनने सलामीवीर पृथ्वी शॉ, मनदीप सिंग, कॅप्टम ऋषभ पंत आणि अक्षर पटेल हे महत्त्वाचे विकेट काढले.
विजय शंकर आणि मनोहर यांच्या उत्तम क्षेत्ररक्षणामुळे ललित यादव रनआऊट झाला. तो महत्त्वाचा क्षण होता. कारण ललित यादव आणि ऋषभ पंतची जोडी जमली होती. ही जोडी फोडणं आवश्यक होतं.
सामना रंगतदार होण्याच्या स्थितीमध्ये असताना मोहम्मद शमीने रोव्हमॅन पॉवेल आणि खलील अहमदची लागोपाठच्या चेंडूवर विकेट काढली. त्यामुळे दिल्लीच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. रोव्हमॅन पॉवेलकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. शमीने त्याला पायचीत पकडलं. आपल्या शेवटच्या षटकात शमीने ही कमाल केली. मोहम्मद शमीने चार षटकात 30 धावा देत दोन विकेट काढल्या.