मुंबई: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कॅप्टन हार्दिक पंड्याने (Hardik pandya) आज टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांनी आज जबरदस्त कामगिरी केली. त्यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन गुजरात टायटन्सला 144 धावांवर रोखलं. केएल राहुलच्या (KL Rahul) लखनौला विजयासाठी 145 धावांची आवश्यकता आहे. लखनौची इनिंग सुरु होण्याआधी ते हे लक्ष्य सहज गाठतील असं वाटलं होतं. पण गुजरातच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. पावरप्ले पूर्ण होण्याआधीच लखनौचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. क्विंटन डि कॉकला (11) धावांवर यश दयालने, केएल राहुलला (8) मोहम्मद शमीने तर करण शर्माला (4) पुन्हा यश दयालने आऊट केलं.
त्यानंतर कृणाल पंड्यावर जबाबदारी होती. पण राशिद खानने आज अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश केला. त्याने कृणाला पंड्याला अप्रतिम गुगलीवर खेळण्यासाठी क्रीझ बाहेर आणलं. कृणालची पावलं क्रीझ बाहेर जाताच विकेटकीपर सहाने कुठलीही चूक केली नाही. त्याने लगेच स्टम्पिंग केलं. कृणालने फक्त 5 धावा केल्या. 10 षटकात लखनौच्या चार बाद 58 धावा झाल्या आहेत. गुजरातचं लक्ष्य छोट असलं, तरी ते पार करणं सोप नाहीय. हे यावरुन स्पष्ट होतय.
आजचा सामना जिंकणारा संघ सर्वप्रमथ प्लेऑफमध्ये दाखल होणार आहे. कारण दोन्ही संघांचे समान 16 गुण आहे. दोन्ही टीम्सनी आठ विजय मिळवलेत. ही दोन अव्वल संघांमधली लढाई आहे.
दरम्यान शुमभन गिलचं अर्धशतक आणि राहुल तेवतियाने अखेरीस केलेल्या फलंदाजीच्या बळावर गुजरातला 144 पर्यंत पोहोचता आला. सलामीवीर शुभमन गिलने 49 चेंडूत नाबाद 63 धावा केल्या. यात सात चौकार होते. तेवतियाने 16 चेंडूत चार चौकारांसह 22 धावा केल्या. लखनौच्या गोलंदाजांनी आज सुपर कामगिरी केली. खासकरुन आवेश आणि मोहसीन खानने भेदक मारा केला. आवेश खानने मॅथ्यू वेड आणि हार्दिक पंड्या हे दोन महत्त्वाचे विकेटस मिळवले. डेविड मिलरने 24 चेंडूत 26 धावा केल्या. यात फक्त एक चौकार आणि एक षटकार होता.