अहमदाबाद : आयपीएल 16 व्या मोसमातील 51 व्या साामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स टीम आमनेसामने होत्या. या सामन्याचं आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सवर 56 धावांनी शानदार विजय मिळवला. शुभमन गिल नाबाद (94), वृद्धीमान साहा (81) आणि गोलंदाज मोहित शर्मा 4 विकेटस हे गुजरातच्या विजयाचे हिरो ठरले. गुजरातने विजयासाठी 228 धावांच टार्गेट दिलं होतं. लखनौच्या टीमने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 171 धावा केल्या.
लखनऊ सुपर जायंट्सचा केएल राहुल याला दुखापत झाल्याने तो या सिजनमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे उर्वरित हंगामासाठी नेतृत्वाची जबाबदारी ही कृणाल पंड्या याच्याकडे देण्यात आली आहे. तर गुजरातचं नेतृत्व हे हार्दिक पंड्या करतोय. यामुळे या सामन्यात दोन्ही सख्खे भाऊ आमनेसामने होते.
गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सवर 56 धावांनी शानदार विजय मिळवला. शुभमन गिल नाबाद (94), वृद्धीमान साहा (81) आणि गोलंदाज मोहित शर्मा 4 विकेटस हे गुजरातच्या विजयाचे हिरो ठरले. गुजरातने विजयासाठी 228 धावांच टार्गेट दिलं होतं. लखनौच्या टीमने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 171 धावा केल्या.
गुजरातचा फिरकी गोलंदाज नूर अहमदने लखनौला पाचवा धक्का दिला आहे. धोकादायक निकोलस पूरनला त्याने मोहम्मद शमीकरवी झेलबाद केलं. पूरनने 3 धावा केल्या. 18 ओव्हर अखेरीस लखनौच्या 5 बाद 155 धावा झाल्या आहेत. लखनौला विजयासाठी 12 चेंडूत 73 धावांची गरज आहे.
मोक्याच्याक्षणी राशिद खानने गुजरात टायटन्सला यश मिळवून दिलं आहे. त्याने धोकादायक क्विंटन डिकॉकलवा बोल्ड केलं. डिकॉकने 42 चेंडूत 71 धावा केल्या. यात 7 फोर आणि 3 सिक्स आहेत. 17 ओव्हर अखेरीस लखनौच्या 4 बाद 152 धावा झाल्या आहेत.
15 व्या ओव्हरमध्ये गुजरातला लखनौची महत्वाची विकेट मिळाली आहे. मोहित शर्माने मार्कस स्टॉयनिसला मोहम्मद शमीकरवी झेलबाद केलं. त्याने 4 धावा केल्या. 15 ओव्हर अखेरीस लखनौच्या 3 बाद 130 धावा झाल्या आहेत.
14 ओव्हर अखेरीस लखनौच्या 2 बाद 122 धावा झाल्या आहेत. क्विंटन डिकॉकने 34 चेंडूत नाबाद 53 आणि स्टॉयनिस 3 रन्सवर खेळतोय. दीपक हुड्डा 11 रन्सवर बाद झाला. 35 चेंडूत 106 धावांची गरज आहे.
10 ओव्हर अखेरीस लखनौच्या 1 बाद 102 धावा झाल्या आहेत. क्विंटन डिकॉकने हार्दिकला सिक्स मारुन लखनौसाठी धावांच शतक पूर्ण केलं. डिकॉक 24 चेंडूत 45 आणि दीपक हुड्डा 5 रन्सवर खेळतोय.
तुफान बॅटिंग करणारा काइल मेयर्स आऊट झाला आहे. मोहित शर्माच्या बॉलिंगवर राशिद खानने त्याचा जबरदस्त झेल घेतला. मेयर्सने 32 चेंडूत 48 धावा केल्या. यात 7 फोर आणि 2 सिक्स आहेत.
8 ओव्हर अखेरीस लखनौच्या बिनबाद 88 धावा झाल्या आहेत. मेयर्स 48 आणि क्विंटन डि कॉक 35 धावांवर खेळतोय.
पावरप्लेच्या 6 ओव्हर्समध्ये लखनौने जबरदस्त सुरुवात केली आहे. गुजरात टायटन्सच्या बॉलर्सची चांगलीच धुलाई केली. 6 ओव्हर्समध्ये बिनबाद 72 धावा झाल्या आहेत. काइल मेयर्स 25 चेंडूत 44 आणि डिकॉक 11 चेंडूत 24 धावांवर खेळतोय. मेयर्सने 7 फोर, 2 सिक्स मारलेत. तेच डिकॉकने 5 फोर मारलेत.
लखनौ सुपर जायंट्सची बॅटिंग सुरु आहे. काइल मेयर्स आणि क्विंटन डि कॉक या सलामीच्या जोडीने टीमला जबरदस्त सुरुवात दिली आहे. 4 ओव्हर अखेरीस लखनौच्या बिनबाद 50 धावा झाल्या आहेत. मेयर्स (29) आणि क्विंडन डिकॉक (17) धावांवर खेळतोय.
लखनौ सुपर जायंट्सची बॅटिंग सुरु आहे. काइल मेयर्स आणि क्विंटन डि कॉक ही सलामीची जोडी मैदानात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 4 धावा झाल्या आहेत.
ऋदिमान साह 43 चेंडूत 81 आणि शुभमन गिलच्या 51 चेंडूत नाबाद 94 धावा या बळावर गुजरात टायटन्सने धावांचा डोंगर उभा केलाय. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 227 धावा चोपल्या. लखनौला विजयासाठी 228 धावांच टार्गेट दिलय.
18 ओव्हर अखेरीस गुजरातच्या 2 बाद 202 धावा झाल्या आहेत. ऋदिमान साहानंतर शुभमन गिलकडून लखनौच्या बॉलर्सची धुलाई सुरु आहे. त्याने 46 चेंडूत 84 धावा केल्या आहेत. यात 2 फोर आणि 6 सिक्स आहेत.
16 ओव्हर अखेरीस गुजरातच्या 2 बाद 184 धावा झाल्या आहेत. हार्दिक पंड्या बाद झाला आहे. मोहसीन खानच्या गोलंदाजीवर त्याने क्रृणाल पंड्याकडे कॅच दिली. त्याने 15 चेंडूत 25 धावा केल्या. ऋदिमान साहानंतर शुभमन गिलकडून लखनौच्या बॉलर्सची धुलाई सुरु आहे. त्याने 40 चेंडूत 74 धावा केल्या आहेत. यात 1 फोर आणि 6 सिक्स आहेत.
स्फोटक बॅटिंग करणारा ऋदीमान साहा अखेर आऊट झाला आहे. आवेश खानच्या गोलंदाजीवर तो कॅच आऊट झाला. 43 चेंडूत त्याने 81 धावा केल्या. यात 10 फोर आणि 4 सिक्स मारले. 13 ओव्हर अखेरीस गुजरातच्या 1 बाद 145 धावा झाल्या आहेत.
9 ओव्हर अखेरीस गुजरातच्या बिनबाद 115 धावा झाल्या आहेत. वृद्धीमान साहाच्या 34 चेंडूत 71 धावा झाल्या आहेत. त्याने 9 फोर आणि 4 सिक्स मारले आहेत. शुभमन गिल दुसऱ्या टोकाकडून साथ देतोय. त्याने 21 चेंडूत 40 रन्स केलेत.
वृद्धीमान साहाच्या तुफान बॅटिंगच्या बळावर गुजरात टायटन्सने पावरप्लेच्या 6 ओव्हर्समध्ये बिनबाद 78 धावा केल्या आहेत. वृद्धीमान साहाने सिक्स मारुन हाफसेंच्युरी पूर्ण केली. त्याने 20 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवली. या खेळीत त्याने 6 फोर आणि 4 सिक्स मारले. साहा (54) आणि शुभमन गिल (22) धावांवर खेळतोय.
वृद्धीमान साहाने सिक्स मारुन हाफसेंच्युरी पूर्ण केली. त्याने 20 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवली. या खेळीत त्याने 6 फोर आणि 4 सिक्स मारले.
4 ओव्हर अखेरीस गुजरातच्या 53 धावा झाल्या आहेत. वृद्धीमान साहाने 19 चेंडूत 46 धावा केल्या आहेत. त्याने 6 फोर आणि 3 सिक्स मारले आहेत. शुभमन गिल दुसऱ्या टोकाकडून साथ देतोय. साहाने मोहसीन खानला धुतलं.
2 ओव्हर्समध्ये गुजरातच्या बिनबाद 23 धावा झाल्या आहेत. आवेश खानला साहाने ओव्हरमध्ये एक सिक्स आणि एक फोर मारला.
गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्याला सुरुवात झाली आहे. गुजरातने पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 12 धावा केल्या आहेत. वृद्धीमान साहा आणि शुभमन गिलची जोडी मैदानात आहे. साहाने पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार मारले.
लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन कृणाल पंड्याने टॉस जिंकला आहे. हार्दिक पंड्याची गुजरात टायटन्स पहिली बॅटिंग करणार आहे. लखनौची टीम फिल्डिंग करेल.
गुजरात विरुद्ध लखनऊ या दोन्ही संघांची या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. गुजरातने 22 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात लखनऊवर 7 धावांनी विजय मिळवला होता. लखनऊने जिंकलेला सामना गमावला होता. त्यामुळे आता लखनऊ या सामन्यात गुजरातवर मात करत मागील पराभवाचा वचपा घेणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ जायंट्स या दोन्ही संघांनी गेल्या वर्षी आयपीएल 15 व्या मोसमातून पदार्पण केलं होतं. तेव्हापासून ते आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये एकूण 3 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये गुजरातने एकतर्फी मैदान मारलं आहे. गुजरातने तीन्ही वेळा लखनऊ सुपर जायंट्सवर विजय मिळवला आहे. त्यामुळे गुजरात निश्चितपणे लखनऊवर वरचढ आहे.