मुंबई: मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) टीम IPL 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमने खूपच खराब प्रदर्शन केलं आहे. याआधी त्यांनी कधी इतका वाईट खेळ केला नव्हता. मुंबई इंडियन्सच्या टीमला सलग आठ पराभवांचा सामना करावा लागला. मागच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) नमवून या टीमने विजयाचं खात उघडलं. पण त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफ मध्ये पोहोचण्याची कुठलीही शक्यता नाहीय. मुंबई इंडियन्स एक विजय, आठ पराभवांसह दोन गुणांसह गुणतालिकेत शेवटच्या 10 व्या स्थानावर आहे. उद्या मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्स विरुद्ध सामना होणार आहे. शुक्रवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन्ही संघ आमने-सामने असतील.
मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या शक्यता संपल्या आहेत. पण मुंबईने हा सामना जिंकला, तर दुसऱ्या संघाचं गणित मात्र नक्की बिघडू शकतं. या सामन्याचं आणखी एक वैशिष्ट्य़ म्हणजे हार्दिक पंड्या पहिल्यांदा मुंबई इंडियन्स विरुद्ध मैदानात उतरेल. मागच्या सीजनपर्यंत हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. मुंबई इंडियन्सने त्याला रिटेन केलं नाही. गुजरात टायटन्सने त्याला कॅप्टन बनवलं.
गुजरातची टीम या सीजनमध्ये दमदार प्रदर्शन करत आहे. पण वरच्या फळीतील फलंदाज त्यांची समस्या आहेत. शुभमन गिल फॉर्ममध्ये नाहीय. ऋदिमान साहाच्या खेळात सातत्य दिसलेलं नाही. मागच्या सामन्यात साई सुदर्शनने चांगली इनिंग खेळली होती. पण फिल्डिंग करताना त्याला दुखापत झाली. तो फिट नसेल, तर अभिनव मनोहरला संधी मिळू शकते. यश दयाल सुद्धा फिट झाला आहे. तो प्रदीप सांगवानच्या जागेवर खेळू शकतो.
दोन्ही टीम्सची संभाव्य प्लेइंग – 11
गुजरात टायटन्स – हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुभमन गिल, ऋदिमान साहा, साई सुदर्शन/अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्जारी जोसेफ, प्रदीप सांगवान/यश दयाल, लॉकी फर्ग्युसन,
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, टिम डेविड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, डॅनियल सॅम्स, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ, जसप्रीत बुमराह